शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली 

By अजित मांडके | Updated: April 20, 2024 17:12 IST

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे.

अजित मांडके,ठाणे : नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकने पुढे असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिली. तसेच पुढील झाडावर जाऊन ट्रक आधळला असल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कारमधील कोणालाही दुखापत झाली नसली तरी देखील ट्रकवरील चालक आणि क्लिनरला दुखापत झाली असून त्यांनी उपचारार्थ मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात रामप्रसाद शहाणी (३२)चालक  रा. भांडुप आणि मोहन शहाणी (४०) क्लिनर रा. भांडूप हे दोघे जखमी झाले आहेत. चालक रामप्रसाद याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून क्लिनरच्या पायाला व चेहऱ्याला दुखापत झाली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. शनिवारी दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास नाशिक वाहीनीवरुन मुंबई मुलुंडकडे रामप्रसाद ट्रक घेऊन जात असतांना तिनहात नाका परिसरातील धर्मवीर नाक्यावर त्यांचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक पुढे असलेल्या कारला घासून पुढे असलेल्या झाडावर जाऊन आधळला. यात कारमधील दोघांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. परंतु ट्रक चालक व क्लिनर जखमी झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर हा ट्रक वाहतुक पोलिसांनी बाजूला करण्याचे काम केले.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात