शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या पोलीस निरीक्षकानं दुचाकीस्वाराला उडवलं; तीन चाकांवर १५ किमी पळवली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 10:53 IST

वाणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

डहाणू: डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष खरमाटे यांनी आपल्या खाजगी गाडीने चिंचणी-तारापूर बायपास जवळ रात्रीच्या सुमारास एका मोटर सायकलस्वाराला जोरदार धडक देऊन पळून गेल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस व ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिंचणी डहाणू येथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.डहाणू पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष खरमाटे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आपल्या खाजगी स्विफ्ट कारने पालघर येथे जात असताना चिंचणी-तारापूर बायपासच्या पुलाजवळ भरधाव वेगाने एका मोटर सायकल चालकाला धडक दिली. यात अरविंद सावे आणि सुरेखा सावे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलीस व ग्रामस्थांनी स्विफ्ट गाडीच्या पाठलाग केला. अखेर अपघात करून पळालेले वाहन डहाणू पोलीस ठाण्यात आढळून आले. अपघात झाल्यानंतर कारचे पुढील भागातील डावीकडचे चाक निखळले. मात्र तरीही जवळपास १५ किलोमीटरपर्यंत कार तीन चाकांवर धावत होती. 

रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, डहाणू-पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी यांनी ग्रामस्थांना शांत केले. सध्या चिंचणीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.