शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या दोन मालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:49 IST

अल्प मोबदल्यामध्ये लहान मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून भांडी घासण्याचे तसेच वेल्डींगची कामे करुन घेणा-या इंद्रजित प्रजापती आणि तन्वीर अन्सारी या दोन मालकांना कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या दोघांचीही जामीनावर सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी दिले होते कारवाईचे आदेशकळवा पोलिसांनी राबविली विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अल्प मोबदल्यामध्ये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांची पिळवणूक करणा-या इंद्रजित प्रजापती आणि तन्वीर अन्सारी या दोघांना कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन बालकामगारांची सुटका करण्यात आली असून, या दोघांनाही आता उल्हासनगर येथील वरिष्ठ बालवसतिगृहात ठेवण्यात आले आहे.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने कळवा पोलिसांनी बालकामगारांविरुद्ध २९ नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेसाठी सलाम बालक, ठाणे चाइल्ड लाइन संस्थेच्या समन्वयक सूचना पेडणेकर यांचीही मदत घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मंगेश महाजन, पोलीस नाईक डी.के. साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जाधव आणि संतोष वसावे आदींच्या पथकाने कळव्यातील भास्करनगर येथील राधाकृष्ण चाळीतील कांता चहा या उपाहारगृहामध्ये २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी एक किशोरवयीन मुलगा भांडी घासताना तिथे आढळून आला. महिना चार हजार रुपये पगाराने इंद्रजित प्रजापती यांनी त्याला कामावर ठेवल्याची माहिती समोर आली. सखोल चौकशीनंतर दुकानाचे मालक प्रजापती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, जमादार महाजन यांच्या पथकाने भास्करनगर परिसरातील शंकर मंदिरातील चाळीमध्ये एका वेल्डिंगच्या दुकानामध्ये वेल्डिंगचे काम करणा-या अन्य एका अल्पवयीन मुलाची सुटका केली. त्याला महिना दोन हजार रुपये पगारावर याच दुकानाचे मालक तन्वीर अन्सारी यांनी कामावर ठेवले होते. चौकशीनंतर अन्सारी यांनाही पोलिसांनी अटक केली. हे दोघेही दुकानमालक अल्प मोबदल्यामध्ये या अल्पवयीन मुलांकडून श्रमाची कामे करून घेत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मालकांची रविवारी जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीLabourकामगार