शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दुबईमध्ये रुग्णालय काढून देण्याच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:12 IST

थेट दुबईमध्ये टेस्ट ट्युब बेबीचे रुग्णालय काढून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी बतावणी करीत त्यासाठीच्या प्रक्रीयेसाठी ठाण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याकडून दोन कोटी १५ लाखांची फसवणूक करणाऱ्या रंगू आणि विद्या रामगोपाल या दाम्पत्याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देडॉक्टर दाम्पत्याला अटकआरोपीची पोलीस कोठडीत रवानगीवर्तकनगर पोलिसांची कारवाई

ठाणे : दुबईमध्ये टेस्ट ट्युब बेबीचे रुग्णालय काढून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील डॉक्टर अतुल डोंगरे आणि त्यांच्या पत्नीकडून दोन कोटी १५ लाखांची रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या रंगू रामगोपाल आणि त्याची पत्नी विद्या (दोघेही रा. लोकपुरम, ठाणे) या डॉक्टर दाम्पत्याला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.डॉ. अतुल डोंगरे यांचे ठाण्याच्या देवदयानगर येथे टेस्ट ट्युब बेबी सेंटर (आयव्हीएफ) सेंटर आहे. जून २०१७ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये रंगू आणि विद्या रामगोपाल यांनी डोंगरे दाम्पत्याला दुबईतील जुमेरा १ व्हीला ३३२-१९३८ व्हीलामध्ये आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हे सेंटर उभारण्यासाठी सहकार्य करण्याची हमी देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डॉ. डोंगरे तसेच त्यांच्या भागीदारांकडून आरटीजीएसने एक कोटी दोन लाख रुपये, तर रोखीने एक कोटी १३ लाख रुपये असे दोन कोटी १५ लाख घेतले. त्यानंतर, डॉ. डोंगरे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही दुबईत रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी कोणतीही मदत केली नाही. शिवाय, त्यांचे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. डोंगरे यांनी याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने रामगोपाल दाम्पत्याला अटक केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी