शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बतावणी करीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:23 IST

वेगवेगळी बतावणी करीत दागिने लुबाडणा-या ठकसेनांच्या टोळीपैकी गुजरातच्या अर्जून सलाट आणि अर्जूनभाई मारवाडी या दोन भामटयांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधून ठाण्यात आले चोरीसाठीनौपाडा पोलिसांनी केली अटक आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

ठाणे: बतावणी करीत भारत राठोड (२१, रा. घणसोली, नवी मुंबई) या तरुणाकडील ८२ हजारांची सोनसाखळी हिसकावणा-या गुजरातच्या अर्जून सलाट (२५) आणि अर्जूनभाई मारवाडी (२२) या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून २६ ग्रॅम वजनाची सोनसाखळीही हस्तगत करण्यात आली आहे. या दोघांनाही १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मासुंदा तलावाजवळील दुय्यम निबंध कार्यालयाजवळून राठोड हे ९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी सलाट आणि मारवाडी या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावून तिथून पळ काढला. हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करुन या दोघांनाही नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अटक केली. यातील सलाट हा गुजरातच्या सर्वोदयनगर, मालपूर रोड, ता. मोंडासा येथील रहिवाशी असून मारवाडी हा साबरकाटा जिल्हयातील हिंमतनगर (गुजरात) येथील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून सोनसाखळीसह पाचशे रुपये दराच्या नोटा दोन्ही बाजूंना लावलेले नोटांच्या आकाराचे कागदाचे बंडल आणि दीड हजार हजार रुपये असा ८३ हजार ५०० चा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी गुजरातमधून महाराष्टÑात येऊन असे अनेक प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा