लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शीळ-डायघर भागातील दुकानात चोरी करणा-या इरफान खान (२०, रा. ठाकूरपाडा, मुंब्रा, ठाणे) आणि मोहम्मद शाबीर खान (२०, रा. तन्वरगन, मुंब्रा, ठाणे) या दोन चोरट्यांना डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख एक हजार ६५७ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.शीळफाटा, खान कम्पाउंडमधील झेड मेमन शॉपमधील दुकानाचे कडी, शटर आणि लॉक उचकटून चोरट्यांनी १ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते २ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास आत शिरकाव केला. या दुकानातून चोरट्यांनी वॉशिंग पावडर, साबण तसेच इतर वस्तूंची चोरी करून पलायन केले होते. याप्रकरणी दुकानाचे मालक जुबेर मेमन यांनी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात २ जानेवारी रोजी चोरीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, मारुती कदम, पोलीस नाईक मुकुंद आव्हाड आणि ललित वाकडे आदींच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या तसेच सीसीटीव्हीच्या आधारे इरफान आणि मो. शाबीर या दोघांनाही ३ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता अटक केली. या दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून दुकानातील वॉशिंग पावडर आणि साबणासह चोरीतील एक लाख एक हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ठाण्याच्या डायघर भागातील दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 21:16 IST
डायघर भागातील दुकानात चोरी करुन पसार झालेल्या इरफान खान आणि मोहम्मद शाबीर खान या दोन चोरट्यांना डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ठाण्याच्या डायघर भागातील दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देडायघर पोलिसांची कारवाई चोरीतील एक लाख एक हजार ६५७ रुपयांचा ऐवज हस्तगत