भिवंडी : कामतघर येथील व-हाळा तलावात आज सकाळी दोन मृतदेह मिळाल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तलावाच्या विसर्जन घाटावर सफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कामगारांना दोन मृतदेह पाण्यावर तंरगताना दिसल्याने आत्महत्येची घटना समोर आली आहे.आज होळी पौर्णिमेच्या निमीत्ताने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व-हाळादेवी विसर्जन घाटाच्या पाण्यातील कचरा बाहेर काढत होते. त्याच कच-याखाली अडकलेले दोन मृतदेह त्यांना दिसल्यानंतर त्यांनी ही माहिती शहर पोलीस ठाण्यास दिली.पोलीसांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. लखन मुन्नालाल जैस्वाल(२१) व प्रविणकुमार सुमंत मंडळ (३०) असे दोघांचे नांव असुन ते संगमपाडा येथे रहात होते. त्यापैकी लखन जैस्वाल हा नृत्य शिक्षक असुन तो गेल्या दोन दिवसांपासून घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी निजामपूर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.परंतू आज त्याचा मृतदेह पालकांच्या हाती लागल्याने परिसरांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यापुर्वी नृत्य शिक्षक श्रवणकुमार मारता याने देखील घरांत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर तलावाच्या दुस-या ठिकाणी प्रविणकुमार मंडळ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या दोन्ही तरूणांचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयांत पाठविले आहे. या घटनेमुळे तलावात होणाºया आत्महत्येबाबत सर्वसामान्य लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.
भिवंडीतील व-हाळा तलावात आढळले दोन मृतदेह, नृत्य शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:25 IST
भिवंडी : कामतघर येथील व-हाळा तलावात आज सकाळी दोन मृतदेह मिळाल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तलावाच्या विसर्जन घाटावर सफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कामगारांना दोन मृतदेह पाण्यावर तंरगताना दिसल्याने आत्महत्येची घटना समोर आली आहे.आज होळी पौर्णिमेच्या निमीत्ताने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व-हाळादेवी विसर्जन घाटाच्या पाण्यातील कचरा बाहेर काढत होते. त्याच कच-याखाली अडकलेले दोन ...
भिवंडीतील व-हाळा तलावात आढळले दोन मृतदेह, नृत्य शिक्षकाची आत्महत्या
ठळक मुद्देविसर्जन घाटातील कचरा काढताना आढळले दोन मृतदेहनृत्य शिक्षकाची आत्महत्यातलावात दुस-या ठिकाणी सापडला दुसरा मृतदेह