शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 15:25 IST

दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे.

भिवंडी - भिवंडी शहरात कोरोना व लॉकडाऊन काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रात असंख्य दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी वेगवेगळी पथके नेमून क्षेत्रात गस्त वाढवली असता दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक भिका भवर यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून माहिती मिळवून जरार मुजफर अन्सारी ( वय 22 , रा.नदिनाका ) यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता शांतीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद असलेल्या MH 04 HT 1863 - शाईन , MH 04 KJ 3273 - बर्गमेन, MH 46 AT 8986 - स्प्लेनडर , MH 04 JG 4680 - स्प्लेनडर अशा 1 लाख 25 हजार रुपयांच्या चार दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी यांच्या पथकाने गस्तीदरम्यान सद्दाम हुसेन याकूब अन्सारी, ( वय 28 रा.संगमपाडा ) यास हटकले असता संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता त्याची दुचाकी चोरीची आढळून आली. त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडून MH 04 GL 4291 - ऍक्टिव्हा, MH 04 JL 8973 - शाईन अशा 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे. एकूण 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात पोलीस पथकांनी यश मिळविले असून, दोन्ही दुचाकी चोरांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.