शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभातून ४० तोळे सोने लुबाडणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:00 IST

ठाण्यातील एका लग्नसमारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाºया अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्यप्रदेश) या दोघांनाही मध्यप्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे १७ लाख ५७ हजारांचे दागिने हस्तगत कासारवडवली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील एका लग्नसमारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाºया अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्यप्रदेश) या दोघांनाही मध्यप्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.घोडबंदर रोड, ओवळा येथे ३० नोव्हेंबर २०२० रोजी अनिता सिंग यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरु असतांना अनिता यांनी फोटो काढण्याच्या वेळी त्यांची पर्स खुर्चीवर ठेवली होती. हीच संधी साधत एका लहान मुलाच्या मदतीने चोरटयांनी ४२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि काही रोकड असलेली पर्स अवघ्या काही मिनिटांमध्ये लंपास केली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, जयराज रणवरे, अविनाश काळदाते आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे तसेच सागर जाधव यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथून बबलू सिसोदिया याच्या घरातून १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे ४२३ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर २७ जानेवारी रोजी अजयसिंग आणि बादल या दोघांना अटक केली. या गुन्हयात कासारवडवली पोलिसांनी १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे ४० तोळयांचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक