शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवा रेल्वे फाटकावर दोन शस्त्रधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:11 IST

दिव्यातील रेल्वे फाटकावर सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने त्या फाटकाच्या दोन्ही बाजूला मंगळवारी प्रत्येकी दोन शस्त्रधारी रेल्वे पोलीस तैनात केले आहेत.

ठाणे : दिव्यातील रेल्वे फाटकावर सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने त्या फाटकाच्या दोन्ही बाजूला मंगळवारी प्रत्येकी दोन शस्त्रधारी रेल्वे पोलीस तैनात केले आहेत. यावेळी फाटक बंद असताना वाहन घेऊन शिरकाव करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून तिघांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये दोन मोटारसायकल व एका सायकलस्वाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.कमी भाडे असो या स्वस्तात विक त मिळणाºया घरांमुळे मागील चार-पाच वर्षात दिवा गावाचे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात उतरल्यावर गावात जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग असल्याने दिवसभरात कधीही पाहिले तरी लोंढेचे लोंढे जाताना दिसतात. त्यामुळे दिवा रेल्वे सुरक्षाबल अंतर्गत येणाºया दिवा रेल्वे फाटक हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण झाले आहे. रूळ ओलांडताना अपघात होणे नित्याची बाब आहे. त्यातच सोमवारी एक्स्प्रेसने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. फाटक बंद असताना, दादागिरी करून वाहने किंवा पायी जाणाºयांची संख्या आणि सोमवारच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रधारी पोलीस तैनात के ले आहेत.>अंदाज न आल्याने अपघात ?फाटक बंद झाल्यानंतरही गावकरी वाहने रूळावर घेऊन उभे राहतात. पण, सोमवारी झालेल्या अपघातात ते दोघे स्थानिक नसल्याने त्यांचा अंदाज चुकला आणि हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या मागे असलेल्या स्थानिकाने जाणाºया गाडीचा अंदाज घेऊन थांबणे पसंत केले होते, असे सूत्रांनी सांगितले.सीसीटीव्हीद्वारेही निगराणी : शस्त्रधारी पोलीस तैनात केले असले तरी, रेल्वे स्थानकात होणाºया बारीक-सारीक गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी ४८ सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे निगराणी ठेवली जात आहे. सद्यस्थितीत सर्व सीसीटिव्ही कॅमेरे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्थानिक संघटना-पुढाºयांची मदत : स्थानिक नागरिकांची प्रत्येक ठिकाणी दादागिरी असते. तशीच दादागिरी दिव्यातही आहे. त्यामुळे रेल्वे फाटक लावल्यावर दादागिरी करण्यांना पाठीशी घालू नये. यासाठी रेल्वे पोलिसांनी प्रवासी,व्यापारी आणि स्थानिक पुढाºयांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पोलिसांना पाठिंबा दर्शवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.गेटमॅनला मारहाण : या फाटकावर तैनात असलेल्या गेटमॅनने गावकºयांना विरोध केल्यास शिवीगाळ करणे ही गोष्ट नेहमीची झाली आहे. त्यातच, काही गेटमॅनाना मारहाण झाली आहे.पाच -सहा महिन्यांपूर्वी मारहाणीचा प्रकार झाल्याचा सुर आता दबक्या आवाजात उमटत आहे. मात्र अशाप्रकारे गेटमॅनला मारहाण करुन पुढे जाणे जीवावर बेतणारे आहे.