शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येनुसार अडीच टक्के फेरीवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 03:08 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले बसवण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला. त्याला फेरीवाला संघटनांनी अनुमती दर्शवली आहे.फेरीवाल्यांच्या विविध संघटनांची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत मंगळवारी झाली. या बैठकीस कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे, अरविंद मोरे, प्रशांत माळी, रमेश हनुमंते, नाना पाटील, संदीप वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.महापालिकेत १० प्रभागक्षेत्रे आहेत. त्यापैकी समजा एखाद्या प्रभागाची लोकसंख्या १० हजार इतकी आहे. तर, तेथे त्याच्या तुलनेत अडीच टक्के म्हणजे २५० फेरीवाले व्यवसाय करतील. २७ गावांसह महापालिका हद्दीतील लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाला सामावून घेतले जाणार आहेत. त्याला फेरीवाला संघटनेने मान्यता दिली आहे. परंतु, कल्याण स्टेशन व डोंबिवली स्टेशन परिसरांत फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तेथे अडीच टक्क्यांचा निकष कसा लावणार, याविषयी ठोस निर्णय झालेला नाही.महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. संघटनांच्या मते हा आकडा १५ हजार इतका असू शकतो. दुसरे सर्वेक्षण झालेले नसले, तरी नऊ हजार ५३१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण संघटनांनी मान्य केलेले आहे.दरम्यान, फेरीवाल्यांना सोडत पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवून दिली जाईल. त्याला फेरीवाल्यांनी प्रथम विरोध केला होता. आता सोडत पद्धतीने जागावाटपाला संघटनांनी होकार दर्शवला आहे.>स्मार्ट सिटीमुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदाफेरीवाला संघटनेचे पदाधिकारी रमेश हनुमंते म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. कल्याण स्टेशन परिसराच्या विकासासाठी ४७५ कोटींची निविदा काढण्यात येणार आहे. पश्चिमेला कामासाठी रेल्वेने अनुमती दिली आहे. तर, पूर्वेला अद्याप रेल्वेकडून मान्यता मिळणे बाकी आहे. कल्याण पश्चिमेसह पूर्वेलाही स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर विकास होणार आहे. तर, फेरीवाल्यांना त्यात सामावून घेतले आहे का, असा सवाल केला जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदा येईल. कल्याण स्टेशन परिसरापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसर विकासाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमला गेला आहे. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरात सगळ्यात जास्त फेरीवाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा विकास स्मार्ट सिटीत नसेल, तर स्मार्ट सिटी ही कष्टकरीवर्गाला विकास प्रक्रियेत सामावून न घेता बाहेर फेकणार असेल. तर आमचा स्मार्ट सिटीला विरोध असेल.