शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 04:48 IST

घरात चोरी करून पळालेल्या समाधान कुमावत (३१, रा. कोलशेत, तरीचापाडा, ठाणे) आणि सूरज रावत (२७, रा. कोलशेत, ठाणे) या दोघांना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे.

ठाणे : महागिरी कोळीवाडा भागातील प्रतिभा अहेर यांच्या घरात चोरी करून पळालेल्या समाधान कुमावत (३१, रा. कोलशेत, तरीचापाडा, ठाणे) आणि सूरज रावत (२७, रा. कोलशेत, ठाणे) या दोघांना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाख आठ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.जळगावला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून पहाटे ५.३० वाजता गाडी आहे. त्यासाठी समाधानने २२ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वा.च्या सुमारास अहेर यांच्या घरी मित्रासोबत मुक्काम ठोकला. सकाळीच दोघेही जाणार असल्यामुळे अहेर यांनीही त्यांना राहण्यासाठी अनुमती दिली. हीच संधी साधून समाधानने पहाटे त्यांचे घर सोडण्यापूर्वी घरातील शोकेसच्या ड्रॉव्हरमधील एक लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये प्रत्येकी ३० हजारांच्या तीन सोनसाखळ्या आणि दोन अंगठ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात २४ आॅक्टोबर रोजी अहेर यांनी तक्रार दाखल केली. या दोघांपैकी समाधान हा ओळखीचा असून त्याने तीन महिन्यांपूर्वी आपल्याला फोन केला होता इतकीच जुजबी माहिती अहेर यांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी समाधानचा मोबाइल क्रमांक माहीत नसतानाही गेल्या तीन महिन्यांत अहेरना आलेल्या फोनचा तपशील तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे समाधानसह दोघांनाही २५ आॅक्टोबरला अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील संपूर्ण एक लाख आठ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. सूरजवर यापूर्वीही कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Arrestअटक