शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास उलटूनही हाती धागेदोरे नाहीत; कार्यकारी अभियंता हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:02 IST

केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलावर चार अनोळखी व्यक्तींनी हल्ला झाला. या घटनेला २४ तास उलटूनही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

डोंबिवली : केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलावर चार अनोळखी व्यक्तींनी हल्ला झाला. या घटनेला २४ तास उलटूनही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून लवकरच हल्लेखोरांना अटक करू, असा विश्वास सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊ त यांनी व्यक्त केला आहे.पाटील यांच्याकडे विविध खात्यांचा पदभार होता. त्यांनी अनेक वर्षे या ठिकाणी काम केले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे फेरीवाला पथकासंदर्भात कार्यभारही होता. तेव्हा स्थानक परिसरातील फेरीवाले तेथून हटवले होते. त्यातून हा हल्ला झाला आहे का, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे राऊत म्हणाले. सध्या पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. याबाबत त्यांचे कोणासोबत खटके उडालेत का? याचाही तपास सुरू आहे. हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले होते. हल्ला करून ते स्कायवॉकच्या पाटकर रोडवरील मधल्या जिन्याने उतरून पळाले. स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ते नेमके कोणत्या दिशेला पळाले, याबाबत काहीच माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, जवळच असलेल्या बँकेच्या किंवा व्यापाऱ्यांकडील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. चौथा शनिवार असल्याने महापालिका आणि बँक बंद होती. या पार्श्वभूमीवर तपासात अडचणी येत आहेत. शिव जयंतीच्या बंदोबस्ताचा परिणामही तपासावर झाला. या हल्ल्यामागे कौटुंबिक कारण असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार आणि सहकारी तपास करत आहेत.पाटील यांची प्रकृती स्थिरअतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. ते शुद्धीवर आले असून त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यांना भेटण्यास परवानगी नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पालिकेचे अभियंता प्रशांत भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी