शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

10 रुपयांना साडीचा सेल पोलिसांनीच बंद पाडला, महिलांची होती मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 00:37 IST

उल्हासनगरची घटना । साडीखरेदीसाठी झुंबड

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील एका दुकानदाराने १० रुपयांत साडीचा सेल सुरू करताच खरेदीसाठी महिलांनी एकच गर्दी केली. गर्दीमुळे अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी दुकानदाराला सेल बंद करण्यास भाग पाडले. उल्हासनगर कॅम्प नं.-२ परिसरातील एका दुकानदाराने १० रुपयांत साडी असा सेल तीन दिवसांपूर्वी लावला होता. साडीखरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, शहापूर, मुरबाड येथून येऊन महिलांनी एकच गर्दी दुकानासमोर केली. गर्दी हाताबाहेर जाण्याची माहिती दुकानदाराला पोलिसांनी दिली. महिलांच्या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून सेल बंद करण्यास पोलिसांनी दुकानदाराला बजावले. तसेच दुकान उघडू नको, अशी तंबी दिली.

वाढत्या गर्दीमुळे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. दुकानदाराने प्रत्येक महिलेला फक्त पाच साड्या खरेदी करा, असे सांगितले. ही बातमी वृत्तवाहिन्यांवर दिसल्याने जिल्ह्यातून महिलांची झुंबड उडाली होती. मात्र, या गर्दीमुळे अखेर दुकानदाराला साड्यांच्या सेलसह काही दिवस दुकान बंद करण्याची वेळ आल्याची माहिती पोलिसांनी दिली. साडीचा सेल बंद केल्याने खरेदीसाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त करून दुकानदाराने सेलच्या नावाने फसवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.पहिल्यांदाच असा प्रकारउल्हासनगरमध्ये कपड्यापासून ते फर्निचरपर्यंतचे मार्केट आहे. होलसेल मार्केट असल्यामुळे राज्यातून नागरिकांबरोबरच विक्रेतेही येथे येत असतात. साधारण १०० रूपयाला एक असा दहा साड्यांचा गठ्ठा विकला जातो. मात्र १० रूपयाला साडी विकण्याचा प्रकार शहरात प्रथमच झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे