शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांसोबत साजरा झाला हळदी-कुंकू समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 23:56 IST

मकरसंक्रांतीचे निमित्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  सर्वांनाच सामावून घेणारा हळदी-कुंकू समारंभ करू या, तीळगूळ देऊन त्यांच्याशीही गोड बोलू या, असा संदेश देण्यासाठी तृतीयपंथीयांसोबत हळदी-कुंकू समारंभ शुक्रवारी साजरा करण्यात आला. समाजाने नाकारलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न होता. कोपरी येथे हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो. याच पद्धतीने तृतीयपंथीयांसोबत आपणच गोड का नाही बोलावे, हा या मागचा उद्देश. ‘लोकमत’च्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीयपंथी माधुरी सरोदे-शर्मा, मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, कथ्थक नृत्य करणारी तृतीयपंथी श्यामली, मेकअप आर्टिस्ट तृतीयपंथी बॉबी या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी कविता म्हात्रे, सुभद्रा गायकवाड, सोनाली गायकवाड, विद्या पाटील, रजनी पाटील, सोनाली पोकळे पवार, मंदा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सुरुवातीला त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे औक्षण केले. समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यात सामील व्हा, हा या कार्यक्रमामागचा हेतू होता. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तृतीपंथीयांना हळदी-कुंकू लावून, त्यांना तीळगूळ, गजरा आणि वाण देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पुरणपोळी आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. लोक तृतीयपंथीयांना भीतीपोटी किंवा दयेपोटी पैसे देतात; परंतु त्यांच्यातील माणूस पाहून त्यांना तीळगूळ देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केले होता, असे कविता म्हात्रे म्हणाल्या.

तृतीयपंथीयांच्या मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम होत असतो; परंतु सामान्य कुटुंबाने घरात बोलवून हा मान दिला, हे पहिल्यांदाच घडले आहे. तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचे आहे. त्यासाठी ‘द्या टाळी’ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या समारंभात आम्हाला निमंत्रण देऊन जो मानसन्मान दिला त्याबाबत म्हात्रे कुटुंबाचे आभार.-माधुरी सरोदे-शर्मा, तृतीयपंथी

ज्यावेळी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यावेळी मला खूप गहिवरून आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिली पायरी आहे. आजही आम्हाला समाज दुर्लक्षित करीत आहे. आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या.-श्रीदेवी, तृतीयपंथी

टॅग्स :thaneठाणेTransgenderट्रान्सजेंडर