भातसानगर : सरकारने रद्द केलेल्या पाचशे, हजाराच्या नोटा बदलण्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना त्यात आता अजून भर पडली, ती दोन हजारांच्या नोटांनी. या नोटा दुकानात बदलण्यासाठी दमछाक होत आहे.पाचशेची नोट बदलण्यासाठी थेट बँक गाठावी लागत आहे. तीही तीनतीन, चार-चार तास रांगेत तहानेने व्याकूळ होऊन उपाशीपोटी व घाणीच्या साम्राज्यात उभे राहून. बँकेतून पैसे काढायचे असतील, तर हीच दशा आणि मिळणार केवळ दोन हजार रु पये. त्यातही दोन हजाराची नोट बदलण्यासाठी तर तारेवरची कसरत करावी लागत असून ती बदलून देताना पुन्हा पाचशेच्या नोटा हातात पडत असल्याने जीवच जात असल्याचे चित्र दिसते आहे. बँकेतून मिळालेली हजाराची नोट दुकानात घेऊन गेल्यानंतर दुकानदार सुटे पैसे देताना पाचशेच्या नोटा देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. (वार्ताहर)
नोटा वटवताना दमछाक
By admin | Updated: November 14, 2016 04:07 IST