शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रोबोस स्फोटाचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:07 IST

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत.

कल्याण : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. त्यामुळे या अहवालात महत्त्वपूर्ण माहिती असून ती दडवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप होत आहे.प्रोबेस स्फोट प्रकरणाची माहिती राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयाकडे मागितली होती. मात्र, त्यांना केवळ समितीच्या बैठकीचे इतिवृत्त देऊन त्यांची बोळवण केली. अहवाल तयार असताना त्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली. नलावडे यांनी कल्याण प्रांताधिकारी कार्यालयाकडे स्फोटप्रकरणी माहिती मागितली असता त्यांचा अर्ज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाकडे वर्ग केला. मात्र, या कार्यालयाने स्फोटाविषयीची माहिती नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. कल्याणच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाºयांनी ही माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अथवा संचालनालयाच्या मुंबई येथील मुख्यालयाकडून दिली जाईल, असे कल्याणच्या प्रांताधिकाºयांना कळवले आहे.नलावडे यांनी १७ एप्रिल २०१८ ला केलेला अर्ज प्रांत कार्यालयाने इतरत्र वर्ग केला. मात्र, ज्या कार्यालयात वर्ग केला, त्यांनी त्यांच्याकडे माहिती नसल्याचे सांगून आपले अंग काढून घेतले आहे. माहिती अधिकाºयाच्या कार्यकर्त्याला योग्य प्रकारे माहिती न देता त्याची दिशाभूल सरकारी यंत्रणाकडून केली जात आहे.चर्चा होणे अपेक्षितप्रोबोस स्फोटाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अहवाल एक महिन्यात सादर करणे अपेक्षित होते.जिल्हाधिकाºयांनी हा अहवाल जुलै २०१७ मध्ये सरकारच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला आहे. हा अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून तो सरकारकडून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी ठेवला जाणे अपेक्षित आहे.अहवाल गोपनीय असल्याचे सांगून त्याची माहिती नलावडे यांना दिली जात नाही. त्यामुळे त्यात गूढ माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने हा अहवाल उघड करणे आवश्यक आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसीBlastस्फोट