शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरहून नवी मुंबईकडे गोवंश मांसाची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 20:51 IST

भिवंडी : संगमनेरहून गोवंश मांसाने भरलेला ट्रक नवी मुंबईकडे जात असताना पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज बुधवारी दुपारी जप्त केला.

भिवंडी : संगमनेरहून गोवंश मांसाने भरलेला ट्रक नवी मुंबईकडे जात असताना पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज बुधवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंबई व नवी मुंबई येथे गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री करणा-या तळवली येथील कत्तल खान्यावर पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी धाड घातली होती.तसेच मागील आठवड्यात म्हापोली येथील कत्तल खान्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी धाड घातल्याने गोवंश तस्करीचा व्यवसाय करणा-या गुन्हेगारांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी तालुक्यातील गोवंशाचे कत्तलखाने बंद करून आपला मोर्चा तालुक्याबाहेर वळविला. याची खबर पडघा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील अर्जुनली टोलनाक्यावर आज दुपारी नाकाबंदी सुरू केली. तेव्हा संशयित ट्रकचालकाने आपला ट्रक पळविला.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तळवली नाक्यावर एमएच१७/बीडी २५६९ हा पळालेला ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये बर्फाच्या तुकड्यांमध्ये गोमांसांचे कोल्ड स्टोरेज केलेले आढळून आले. या बर्फाच्या पाण्यासोबत मांसाचे रक्तमिश्रित पाणी रस्त्यावर सांडू नये यासाठी ट्रकच्या डिझेल टाकीच्या विरुद्ध दिशेला डिझेल टाकी बनवून त्यामध्ये हे पाणी साठविले जात होते. ते रक्तमिश्रित पाणी निर्जन ठिकाणी टाकून दिले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिल्याने हा ट्रक पकडून त्यामधील सात टन गोवंश मांस पोलिसांनी जप्त केले. हे मांस घेऊन वाशी नवी मुंबई येथील मयूर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यास जात असल्याची कबुली ट्रक चालक निसार अब्दुल शेख(२८) व जाकीर खान नसीर खान(३६)यांनी दिल्याने त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी