शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गर्दीच्या वेळेस घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यावर ट्रक बंद, वाहतुकीची तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:01 IST

घोडबंदरकराची दिवसाची सुरवात आज वाहतुक कोंडीनेच झाली. आनंद नगर भागात वळण घेताना ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. दुसरीकडे ही कोंडी सुरळीत होत असतांना खारेगाव टोलनाक्यावरही एका तासात दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देतीन तास वाहतुक कोंडीएका तासाच्या फरकाने दोन ट्रक बंद

ठाणे - मागील काही दिवसापासून घोडबंदर आणि भिवंडी - नाशिक महामार्गवर वाहतुक कोंडी होत आहे. त्यात शुक्रवारी सकाळी घोडबंदर भागातील आनंद नगर येथे वळणावर ट्रक बंद पडल्याने ठाण्याच्या दिशेने आणि पुढे घोडंबदरकडे जाणारी अशी दोनही बाजूची वाहतुक तब्बल दिड ते दोन तास ठप्प झाली होती. ही कोंडी सुटत नाही तोच खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासात दोन ट्रक बंद झाल्याने या भागातही नाशिकच्या दिशेने जातांना माजिवड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात या महामार्गावर ठिकठिकाणी आणि उड्डाणपुलांवर सुध्दा खड्डे पडले असल्याने वाहतुक कोंडीत त्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.                           शुक्रवारची सकाळ घोडबंदरकरांना वाहतुक कोंडीची ठरली. सध्या या भागात मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यात आजच्या वाहतुक कोंडीने घोडबंदरकरांची आणखी डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८ च्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने जात असलेला ट्रक आनंद नगर येथे वळण घेत असतांना त्याच ठिकाणी बंद पडला. त्यामुळे घोडबंदरकडे जाणारी आणि घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणारी अशी दोनही बाजूची मार्गिका जाम झाली. त्यानंतर बुस्टरच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात आला. तो पर्यंत दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलिसांना ११ वाजले. भर पावसात अगांवर रेनकोट घालून वाहतुक पोलिस ठिकठिकाणी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसले. परंतु तरी सुध्दा ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनाही तीन तासांची पराकाष्टा करावी लागली. तर या मार्गावरील रस्त्यावर, उड्डाणपुलावर आणि सेवा रस्त्यांवर खड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सुध्दा वाहतुक कोंडीत अधिकची भर पडलेली दिसून आली.दुसरीकडे या मार्गावरील वाहतुक टप्याटप्याने सुरळीत होत असतांना दुसरीकडे भिवंडी - नाशिक महामार्गावर माजिवड्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे भिवंडीच्या दिशेने जाणारा उड्डाणपुलावरही वाहतुक जाम झाली होती. खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासाच्या कालावधीत दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहतुक कोंडी झाली होती. तसेच पुढे मानकोली येथे या महामार्गावर खड्डे असल्याने आणि साकेत पुलावरही खड्डे पडल्याने वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यात अवजड वाहनांची वाहतुकही याच कालावधीत घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणाऱ्या महामार्गावर आल्याने वाहतुक कोंडीत आणखीन भर पडल्याचे दिसून आले. ऐन कामावर जाण्याच्या वेळेसच सकाळी या तीन घटना टप्याटप्याने घडल्याने वाहतुक कामावर जाणाºया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. 

 रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरु असलेले काम, खड्यांमुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग आणि त्यात घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यावर वाहने बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. आता हळू हळू वाहतुक पूर्वपदावर आली आहे.(अमित काळे - पोलीस उपायुक्त, वाहतुक विभाग) 

टॅग्स :thaneठाणेhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी