शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी; टेंभी नाक्याचे वातावरण भगवेमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:48 IST

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच  ठाण्याला  मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यात मागील १२ ते १५ दिवसापासून शिंदे हे ठाण्यापासून आणि आपल्या घरापासून दूर होते.

ठाणे- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे सोमवारी प्रथमच ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाण्यातील त्यांच्या समर्थकांनी केली आहे. टेंभी नाका ते शक्तीस्थळ हे संपूर्णपणे भगवेमय झाल्याचे दिसत होते. याठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तर शक्तीस्थळावर ते प्रथम जाणार असल्याने त्या ठिकाणी व्हीआयपी डी तयार करण्यात आला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तर आनंद आश्रम हा पूर्ण फुलांनी सजविण्यात आला असून आनंद दिघे यांच्या तसबीरीलादेखील फुलांची आरास करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच  ठाण्याला  मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यात मागील १२ ते १५ दिवसापासून शिंदे हे ठाण्यापासून आणि आपल्या घरापासून दूर होते. परंतु आता ते मुख्यमंत्री म्हणून ठाण्यात प्रथमच येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाण्यातील त्यांच्या समर्थकांनी किंबुहना शिवसैनिकांनी केल्याचे दिसून आले. 

एकनाथ शिंदे हे सुरुवातीला आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट देणार असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच याठिकाणी व्हीआयपी डी तयार करण्यात आला आहे. तसेच शक्तीस्थळ हे संपूर्णपणो फुलांनी सजविण्यात आले आहे.

दुसरीकडे ज्या आनंद आश्रमातून दिघे यांनी जिल्ह्याचा कारभार हाकला. त्या आनंद आश्रमाचे देखील आज रुपडे पालटल्या सारखे दिसत आहे. आनंद आश्रम देखील पूर्णपणे फुलांनी सजविण्यात आला आहे. तसेच याठिकाणी आनंद दिघे यांच्या तसबीरीला देखील फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच दिघे यांच्या पुतळ्याजवळ देखील अशाच स्वरुपाची फुलांची सजावट करण्यात आली आहे. याठिकाणी देखील पोलीसांचा फौजफाटा सकाळ पासूनच सज्ज ठेवण्यात आला आहे.  

याशिवाय या भागात भगवे  झेंडे प्रमुख आकर्षण ठरत आहे. आम्ही आजही शिवसेनेत असल्याचे प्रतिक या  झेंड्यांच्या रुपाने पहावयास मिळत आहे. टेंभी नाका, कोर्ट नाका, जांभळी नाका, शक्तीस्थळ आदी भागात भगवे झेंडे दिसत असून येथील वातावरणच भगवेमय झाल्याचे दिसत होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे