शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सुरीने हल्ला करुन मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:51 IST

सुरीने हल्ला करुन गणेश किरवे (४०, रा. वारलीपाडा, ठाणे) यांच्या १३ हजारांच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया वैभव परब याच्यासह तिघांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे श्रीनगर पोलिसांची कामगिरीशिवीगाळ करुन दमदाटी करीत पैसे आणि मोबाईलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुरीने हल्ला करुन गणेश किरवे (४०, रा. वारलीपाडा, ठाणे) यांच्या १३ हजारांच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया वैभव परब याच्यासह तिघांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.वागळे इस्टेट, श्रीनगर भागात राहणारे किरवे हे १८ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रोड क्रमांक १६, वागळे इस्टेट येथून त्यांच्या मोटारकारने जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या कारचा दरवाजा उघडून किरवे यांना ‘कट का मारलास’ असे बोलून त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी करीत पैसे आणि मोबाईलची मागणी केली. तेंव्हा आपल्याकडे पैसे नसल्याचे किरवे यांनी सांगितल्यानंतर वैभव याने लोखंडी सुरीने किरवे यांच्या पायाच्या ढोपराखाली वार करुन त्यांच्याकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. तर त्याचा साथीदार संकेत गायकवाड याने त्यांना कारच्या बाहेर खेचले. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक