शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:54 IST

कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली.

ठाणे : कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्नाबरोबरच अन्य मागण्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी नुकतेच दिले.आ. ना. गो. गाणार व आ. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने नागपूर येथे मुख्यमंत्र्यांबरोबर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.सेवाग्राम ते नागपूर १०५ किलोमीटरचे अंतर पायी दिंडी काढून विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शेकडो शिक्षकांनी विधानभवनावर मोर्चा काढला. ठिय्या आंदोलन केले. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. या संदर्भात शिक्षकांनी शासनाकडे इच्छामरणाची मागणी केली. यावेळी शिक्षक गाणार व डावखरे यांनी पुढाकार घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच शिक्षकांच्या मागणीविषयी ठोस भूमिका घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे व उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीचे तानाजी नाईक यांची शिष्टमंडळासह बैठक झाली. फडणवीस यांनी शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन योग्य आहे. नजीकच्या काळात सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे ते म्हणाले. यावेळी आर. झेड. बावीस्कर, अजय भोयर, सुरेश कामनापुरे, प्रदिप जांगळे, एस. के. व्हाहुरवाघ, अमित प्रसाद, सुनील कल्याणी, प्रकाश पाटील, गजानन काटकर यांच्यासह अन्य शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सहानुभूती : डावखरेकायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आपल्याला सहानुभूती आहे. आगामी काळात शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी गाणार यांच्यासह आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे डावखरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTeacherशिक्षक