शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिवासी महिला? श्रमजीवीला न्याय मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:00 IST

जिल्हा विभाजनानंतर प्रथमच अस्तित्त्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी महिलेला मिळण्याची शक्यता आहे. हे आरक्षण आधीच जाहीर झाले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा विभाजनानंतर प्रथमच अस्तित्त्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी महिलेला मिळण्याची शक्यता आहे. हे आरक्षण आधीच जाहीर झाले होते. पण निवडणुकीवरील बहिष्कार, नंतर न्यायालयात दिलेले आव्हान यामुळे त्या समाजासाठी आरक्षण असूनही ते प्रत्यक्षात आले नव्हते. तसे झाले, तर भाजपाला पाठिंबा दिलेल्या श्रमजीवी संघटनेला त्याचा लाभ होण्याची आणि त्या माध्यमातून सत्ता उपभोगण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.लोकसंख्येचा निकष लावून हे आरक्षण जर आदिवासींकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आणि घटनात्मकदृष्ट्या मिळालेला हक्क डावलला गेला, तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी आदिवासी समाजातील नेत्यांनी केल्याने अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार हा मुद्दा निवडणुकीच्या निकालाइतकाच क्लिष्ट बनण्याची चिन्हे आहेत.ठाणे जिल्हा विभाजनानंतर जानेवारी २०१५ ला होणाºया ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एसटी महिलेसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. मात्र कल्याण-डोंबिवलीजवळच्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे आणि लोकसंख्या वाढलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा मुद्दा पुढे करून राजकारण्यांनी निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकला. त्याला न जुमानता ज्यांनी उमेदवारी दाखल केली. ते आठ अपक्ष बिनविरोध निवडून आले होते. पण सदस्य संख्येअभावी जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. नंतर सहा महिन्याच्या कालावधीत पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या. तोवर २७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश झाल्यामुळे ११ गट कमी झाले. यामुळे अन्य ठिकाणी या गटांचा समावेश करून ५५ गटांचे आरक्षण पडले. पण निवडून आलेल्या आठ सदस्यांचे पद तसेच ठेवून निवडणूक घोषित करण्यात आली होती. त्याविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाची स्थगिती मिळवण्यात आली आणि सर्व युक्तिवाद, प्रक्रिया पार पाडून आता निवडणूक होते आहे.या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कोणाचा हक्क असेल, अशी चर्चा जिल्ह्यात मतदान प्रक्रियेच्या काळात सुरू आहे. आधीच्या आरक्षणानुसार एसटी महिलेलाच संधी मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय नेत्यांत सुरू आहे. तसेही पाच वर्षात अडीच-अडीच वर्षानंतर अध्यक्षपदाचे आरक्षण बदलते. दोन वेळा निवडणुका घोषित होऊनही जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही व दुसºयांदा घोषित झालेल्या निवडणुकीलाही अडीच वर्ष पूर्ण झाले नाही. यामुळे कायदेशीर आणि तांत्रिकदृट्या एसटी महिलेलाच अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी, असा मुद्दा त्या समाजातील नेत्यांनी पुढे आणला आहे. अन्य समाजाच्या नेत्यांनी मात्र लोकसंख्येचा निकष चर्चेत आणत ओबीसी किंवा खुल्या गटाचे आरक्षण पडण्याची शक्यता मांडली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक