शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:35 IST

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करण्यात आली. पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील तरु णाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताला टांगण्यात आले, तर धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली.गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता. वसई येथून एसटीने कामावरून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी महाळुंगे बसस्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली. तिच्या घराकडे जाणारा रस्ता झाडाझुडुपांतून असल्याने अचानक तिला दोघांनी अडवले व उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.या घटनेप्रकरणी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गणेशपुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील सागर सुरेश पठारे (२७) या तरु णाचा मृतदेह कुरु ंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या चाळीतील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. सागर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीला गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.>भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाºया सख्ख्या मेहुण्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्ख्या भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख हे भावोजीचे नाव आहे.त्याचे धामणगाव येथे ‘ए-वन केशकर्तनालय’ दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (३०) हा काम करीत होता. मात्र, अरमान यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले.यावेळी अरमान याने अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. आरोपी अरमान याची भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करत आहेत.