शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील आदिवासी आयुक्तालयावर डीबीटी विरोधात आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिंनींची सोमवारी धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:37 IST

राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत.

ठळक मुद्देडीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या उपासमार सुरू आहेडीबीटी रद्द करून वस्तीगृहातील भोजन व्यवस्था सुरू ठेवण्याच्या मागणीसह...

ठाणे : डायरेक्ट बेनॅफिट ट्रान्स्फर (डीबीटी) ही योजना राज्य शासनाने लागू केली. पण त्याव्दारे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर भत्याच्या रकमा व मानधन वेळेवर मिळत नाही. यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे डीबीटी रद्द करण्यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थी राज्यभरातील आदिवासी विकास अप्पर आयुक्तालय, प्रकल्प कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन ६ आॅगस्ट रोजी छेडणार आहेत. येथील वागळे ईस्टेटमधील अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन पार पडणार.           राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत. या योजनेव्दारे मिळणाऱ्या भोजन भत्यातून विद्यार्थींना वस्तीगृहाबाहेर खानावळ लावावली लागत आहे. पण शासनाकडून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार ५०० रूपये दरमहा न मिळता ते तीन-तीन महिन्यांनी मिळत आहे.

           या दिरंगाईमुळे खाजगी खानावळीच्या जेवणालाही आदिवासी विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहेत. या समस्येमुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून गावी जावे लागल आहे. ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी डीबीटी रद्द करून वस्तीगृहातील भोजन व्यवस्था सुरू ठेवण्याच्या मागणीसह शिष्यवृत्तीतील समस्या दूर करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडले जात आहे. वागळे इस्टेट, ठाणे येथील कार्यालयावर कोपरी वस्तीगृहातील सोनाली वळवी, भावना भुसारा व गुरूनाथ सहारे हा लॉ कॉलेजचा विद्यार्थी या ठिय्या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेStudentविद्यार्थी