शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील चॅलेंजेसचा ट्रेण्ड पडू शकतो महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 00:01 IST

कपल, बापलेक चॅलेंज : फोटोंचा गैरवापर होण्याची भीती

स्रेहा पावसकर ।

ठाणे : सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्यांची काही कमी नाही. या सोशल मीडियावर कायम काहीतरी नवीन ट्रेण्ड येत असतो आणि तो तितकाच हिटही होतो. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक चॅलेंजेस फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर पाहायला मिळाली. अनलॉकनंतर अनेकजण पुन्हा कामात व्यस्त झाल्याने मागील काही दिवसांत या चॅलेंजेसची क्रेझ काहीशी कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या चॅलेंजेसचा ट्रेण्ड आला असून कपल चॅलेंज, बापलेक चॅलेंज, फॅमिली चॅलेंज अशी अनेकविध चॅलेंजेस घेऊन तसे फोटोही नेटकऱ्यांकडून पोस्ट केले जात आहेत. मात्र, या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती असल्याने पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊनमुळे बरेच जण वर्क फ्रॉॅम होम होते. अनलॉकनंतर काही कार्यालये, उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मात्र,अजूनही सर्व कार्यालये सुरू झालेली नाहीत. अनेक जण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालवत आहेत. या सोशल मीडियावर काहीतरी नवा ट्रेण्ड अनुभवण्यास नेटकरी उत्सुक असतात.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर विविध ट्रेण्ड दिसले, अनेक चॅलेंजेस आले. जुन्या फोटोंना कमेंट करणे, १० ईअर्स चॅलेंज, सारी चॅलेंज, सोलो फोटो चॅलेंज, मदरहूड डेअर चॅलेंज, फिटनेस चॅलेंज, फॉरएव्हर प्रोफेशन चॅलेंज, डान्सिंग चॅलेंज असे एक ना अनेक चॅलेंजेस नेटकºयांनी एकमेकांना दिले आणि अनेकांनी ते एक्सेप्ट करत त्याचे फोटोही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केलेले पाहायला मिळाले. हे चॅलेंजेसचे फॅड मध्यंतरी कमी झाले होते. पुन्हा एकदा कपल, बापलेक चॅलेंज, फॅमिली चॅलेंजेस देऊन तसे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. तरुणवर्गच नाहीतर अगदी ज्येष्ठही फोटो शेअर करत आहेत.असा होऊ शकतो गैरवापरसोशल मीडिया विशेषत: फेसबुकने भारतातील निवडणुकांसाठी भाजपला पुरक अशी भूमिका घेतली, असा आरोप यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे या चॅलेंजेसमध्ये वापरण्यात येणाºया फोटोंच वापर एडिट करून बिहारसह आगामी काळात येणाºया निवडणुकांच्या जाहिराती व अन्य कारणांसाठी वापर होण्याची भीती किंवा पॉर्न क्लिप तयार करण्यासाठीही होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा पोस्ट टाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे पोलिसांनी तर सावधानतेचा इशाराच दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे