शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 01:58 IST

लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कल्याण : सलग तिसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार पाहावयास मिळाली. अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेले पाणी ओसरण्यास मदत झाली. लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारपासूनच संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवस राहिलेला पावसाचा जोर रविवारी फारसा दिसून आला नाही. रात्रीच्या विश्रांतीनंतर पावसाने सकाळी पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे काही सखल भागांत पाणी साचले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. रविवारी कल्याण-डोंबिवलीत १३ ठिकाणी झाडे पडली. कल्याणमधील मुरबाड रोड, वालधुनी उड्डाणपूल, हाजीमलंग रोड, चक्कीनाका, पत्रीपूल उर्दू शाळा तर डोंबिवलीतील पांडुरंग शाळेजवळ, आयरेगाव, म्हात्रेनगर, नवापाडा, गरिबाचा वाडा, बालभवन, एमआयडीसी निवासी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. गरिबाचा वाडा येथे झाड पडल्याने मालमत्तेचे झालेले किरकोळ नुकसान वगळता अन्य कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.पाणी तुंबल्याच्या तक्रारी आलेल्या नसल्याचेही ते म्हणाले. कल्याण ग्रामीण भागात दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे येथील वडवली नदी आणि देसाई खाडी तुडुंब भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या गावात तसेच तेथील गृहसंकुलांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.संरक्षक भिंत कोसळलीसंततधार पडणाºया पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहाची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना रविवारी घडली. एम्स रुग्णालय रोड, मॉडेल कॉलेज, मिलापनगर तलाव रोडवर पावसाचे पाणी साचले होते. नवीन गटार बांधणीची कामे अर्धवट राहिल्याने तसेच नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्याचबरोबर खाजगी केबल कंपन्यांनीही खोदलेले रस्ते सुस्थितीत न केल्याने काही ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती.