शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वृक्ष प्राधिकरण समिती जाणार नैनिताल ला तर महिला बालकल्यााण समिती दार्जिलिंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:21 IST

मीरा भार्इंदरकरांच्या पैशां मधुन सर्व नगरसेवक मे मध्ये कुर्ग या पर्यटनस्थळी जाणार असतानाच १२ एप्रिल रोजी वृृक्ष प्राधिकरण समितीतले नगरसेवक नैनीताल डेहराडुन

मीरारोड - मीरा भार्इंदरकरांच्या पैशां मधुन सर्व नगरसेवक मे मध्ये कुर्ग या पर्यटनस्थळी जाणार असतानाच १२ एप्रिल रोजी वृृक्ष प्राधिकरण समितीतले नगरसेवक नैनीताल डेहराडुनला तर महिला बालकल्याण समितीच्या नगरसेविका देखील दार्जिलींग या पर्यटनाच्या ठिकाणी अभ्यास दौरयाच्या आड जाणार आहेत. दरम्यान आजच्या लोकमतच्या वृत्ता नंतर काँग्रेसने आपले नगरसेवक जनतेच्या पैशातुन पर्यटनस्थळी जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर माजी महापौर गीता जैन, शिवसेनेच्या दिप्ती भट यांनी देखील दौरयाला जाणार नसल्याचं कळवलं आहे.मीरा भार्इंदर महापालिकेच्या अनागोंदी व भ्रष्टकारभारा मुळे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. तिजोरीत पैसा नाही म्हणुन एकीकडे नागरीकांवर तीन कर व दरवाढीचा बोजा टाकण्यात आलाय. इतकंच काय तर सत्ताधारी भाजपाने निधी कमी केला म्हणुन डास निर्मुलनासाठी फवारणी करणारया १८० कंत्राटी कामगारांना घरी बसवण्यात आले आहे.अशा सर्व परिस्थतीत पालिकेच्या सर्व नगरसेवकांसाठी स्थायी समितीने मे मध्ये मँगलोर जवळील कूर्ग या पर्यटनस्थळी दौरा निश्चीत केलाय . त्यासाठी ४५ लाख रुपयांची तरतुद केली आहे. तर विमानाने प्रवास व आलिशान हॉटेलात राहणं व पर्यटन स्थळांना भेटी देणं असा हा अभ्यासाच्या नावाखाली दौरा जाणार आहे.तर येत्या १२ एप्रिल रोजी वृृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नगरसेवक हे नैनिताल, डेहराडुन साठी रवाना होणार आहेत. ते १७ एप्रिल रोजी परत येतील. नगरसेवक व अधिकारी हे नैनिताल मधील नैनी लेक, बोटींग, रोप वे, जीम कॉर्बेट अभयारण्य, जंगल सफारी आदिचा मनसोक्त आनंद घेतील. शिवाय नैनिताल नगरपरिष व फॉरेस्ट रिसर्च इन्स्टीट्युटला भेट देतील. या समितीच्या दौरया साठी सुमारे १० लाखांची तरतुद असल्याचे सुत्रांनी सांगीतले.या शिवाय महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभपाती व सदस्य नगरसेविका देखील अभ्यास दौरयाच्या नावाखाली दार्जिलींग, गँगटोक आदी पर्यटन स्थळी जाणार आहेत. त्यांचा दौरा देखील विमानाने असुन आलिशान हॉटेलात वास्तव्य असेल. ते देखील तेथील पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत. सदर दौरयासाठी देखील सुमारे १० लाखांच्या खर्चाची तरतुद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले.शहरातील नागरीकांवर करवाडीची कुरहाड, आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकास कामां करीता पैसा नसल्याची ओरड, कर्मचारी कपात व डास फवारणी आदी सुविधा देण्यासाठी पैसे नसताना नगरसेवकांनी जनतेच्या पैशां वर पर्यटन स्थळी दौरयाला जाणे लाजीरवाणे आहे. त्यामुळे आमचे नेते मुझफ्फर हुसेन व सर्व काँग्रसच्या १२ नगरसेवकांनी अशा दौरयांना न जाण्याचा निर्णय घेतल्याचे नगरसेवक अनिल सावंत म्हणाले.आमचे नगरसेवक जाणार नसल्याने त्यांचा दौरयासाठीचा होणारा खर्च हा डास फवारणी साठी तसेच प्रभागातील नागरीकांना सोयी सुविधा देण्यावर खर्च करावा अशी मागणी केल्याचे सावंत म्हणाले.दुसरी कडे माजी महापौर गीता जैन यांनी देखील आपण जनतेच्या पैशां मधुन पर्यटन करायला जाणार नसल्याचे स्पष्ट करत दौरयाचा खर्च उलट जनतेच्या किंवा महिला - विद्यार्थी यांच्या साठी खर्च करावा असं त्या म्हणाल्या.शिवसेनेच्या दिप्ती भट यांनी देखील आपण दौरयाला जाणार नसल्याचे पत्रच आयुक्तांना दिले आहे. व आपला दौरयासाठीचा खर्च प्रभागात मी सुचवलेल्या विकास कामांसाठी करावा अशी मागणी केली आहे.