शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कोरोनाकाळात जिल्ह्यात 11,438 कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:52 IST

महिला व बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोच केले वाटप

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांच्या गावपाड्यांसह खेड्यांमध्ये आजमितीस एक हजार ६९० कुपोषित (सॅम, मॅम) बालके जिल्ह्यात रांगत आहेत, तर कोरोना कालावधीत म्हणजे कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या संचारबंदीत ११ हजार ४३८ तीव्र व मध्यम कुपोषित बालकांवर आरोग्य यंत्रणेने उपचार केले आहेत. त्यांच्या सुदृढ आरोग्याकरिता महिला व  बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोहोच वाटप करून त्यांची काळजी घेतली. यामध्ये तीव्र कुपोषित एक हजार १५ बालकांसह मध्यम कुपोषित दहा हजार ४२३ बालकांचा समावेश आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर उपचार करावा लागल्याचे अहवालावरून उघड झाले आहे.जिल्ह्यात गावपाड्यांतील या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी शहापूर, डोळखांब या दोन मोठ्या प्रकल्प कार्यालयांसह सात अंशत: आदिवासी प्रकल्प कार्यालये सक्रिय आहेत. या यंत्रणेद्वारे व आरोग्य विभागाच्या निगराणीत या १४७ तीव्र कुपोषित (सॅम) बालकांसह मध्यम कुपोषित (मॅम) एक हजार ५४३, असे एक हजार ६९० कुपोषित आहेत.कुपोषित मुलांवर उपचार करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असल्याचे दिसून येत आहे.

 जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात सध्याच्या प्रत्येक कुपोषित बालकाचे ट्रेसिंग व ट्रेकिंग, सीटीसी, एनआरसी आणि व्हीसीडीसीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दत्तक पालक योजनेवर कुषोषित बालकांची श्रेणी सुधारण्यावर भर दिला जात आहे. याकरिता महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर दिला जात आहे. यातून नियमित पर्यवेक्षण व संनियंत्रणावर लक्ष दिले जात आहे.     - भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी     अधिकारी, जि. प. ठाणे

१७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्तnजिल्ह्यातील एक हजार ७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षाच्या कालावधीत ३५७ तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा होऊन ते कुपोषणमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक ५०७ तीव्र कुपोषित बालके २०१६ ला कुपोषणमुक्त झाली आहेत. nत्याखालोखाल २०१७ ला ४१६ बालके, तर २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत अनुक्रमे २६४ व २२९ तीव्र कुपोषित बालके या जीवघेण्या कुपोषणातून मुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. nमात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर वर्षभर उपचार करावा लागला आहे.