शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ठाणकरपाड्यात कचऱ्याची समस्या

By admin | Updated: July 13, 2015 03:16 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले

अरविंद म्हात्रे , चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी कचऱ्याची समस्या, गटारांच्या दैनंदिन साफसफाईची समस्या मात्र आहेच. या प्रभागातील बराचसा भाग बैठ्या चाळींचा आहे. दोन चाळींच्या पाठीमागच्या गल्ल्यांकडे दुर्लक्ष आहे. गजानन महाराज मंदिर रोडवरील अष्टविनायक चाळीमध्ये पायवाटा नाहीत. कधी तरी बसविलेल्या जुन्या लाद्या निखळलेल्या आहेत. येथे पेव्हरब्लॉक अथवा नव्या टाइल्स का बसविल्या नाहीत, असा सवाल चाळीत राहणारे नागरिक विचारत आहेत.स्वच्छतेच्या बाबतीत जेथे काळजी घ्यायला पाहिजे, तेथे ती घेतली जात नाही. जैन शाळेच्या बाजूलाच कचराकुंडी आहे. या दुर्गंधीचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. आग्रा रोडवरून ठाणकरपाड्यात जाताना रस्त्यावरच ही कचराकुंडी आहे. सकाळी कचरा उचलला तरी दिवसभरात ती पुन्हा भरते. अशीच अवस्था गजानन महाराज मंदिराजवळ आहे. या दोन्ही कचराकुंड्या येथून हटविण्यास नगरसेवकाला काय अडचण आहे, असा सवाल नागरिक करीत आहे. सरहद्दीचा वाद येथेही आहे. ठाणकरपाडा आणि काळातलाव यांच्या हद्दीवरील ठाणकरपाडा- गावठाणचा रस्ता, गटारे अद्याप प्रलंबित आहेत. याच रस्त्यावर मनपाचे हॉस्पिटल आहे. मात्र, विकासकाच्या अनियमित बांधकामामुळे हे सेवेसाठी तयार असलेले हॉस्पिटल अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागातील नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्यच नाही. मनपा अधिकाऱ्यांचेही काही जात नसल्याने ते गंभीर नाहीत. मला काय त्याचे, ही धारणा दोघांचीही असल्याने हे हॉस्पिटल सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागामध्ये दुर्गानगर, गजानन महाराजनगर, मोहिंदरसिंग काबुलसिंग रोडकडून रमाबाई आंबेडकरनगर, परवाणीचापाडा, साईबाबानगर आदी परिसरांचा समावेश आहे.मोहिंदरसिंग काबुलसिंग रस्त्यावरून हायवेकडे जाताना गजानन महाराज मंदिराकडे वळणाऱ्या रस्त्यावरच सम्राट अशोक चौक आहे. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार निधी खर्च झाला आहे. परंतु, चौकाच्या सुशोभीकरणाची कोणतीच निशाणी नजरेस पडत नाही. फक्त सम्राट अशोक चौक असा बोर्ड आहे. विधान परिषद आ. संजय दत्त यांनी हा निधी दिलेला आहे. मात्र, ज्या कामासाठी निधी मिळाला, त्यासाठी तो वापरला गेला नसल्याने चौक भकासच आहे. नगरसेवकाने मात्र प्रभाग समस्यामुक्त झाल्याचा दावा केला आहे.