शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागातच तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:32 IST

स्वत:च्या प्रभागातील पुसाळकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कचराकुंड्यांकडे विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे

प्रशांत माने डोंबिवली : केडीएमसीत विरोधी पक्षनेते म्हणून शहर अस्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी आणि प्रशासनावर तोंडसुख घेतले जात असताना, मात्र स्वत:च्या प्रभागातील पुसाळकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कचराकुंड्यांकडे विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. टंडन रोडवरील एका वसाहतीसाठी कचराकुंड्या ठेवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जॉगिंग तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाºया नागरिकांना यामुळे नाक मुठीत धरूनच वावरावे लागत आहे.पूर्वेकडील रामनगर प्रभागातील टंडन रोडवर केडीएमसीचे विजय वामन पुसाळकर उद्यान आहे. हे उद्यान चांगल्या स्थितीत असले तरी याला लागूनच शौचालय आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच तीन कचराकुंड्या आहेत. या कुंड्यांमुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप लावण्यात आले आहे. तर, उद्यानात जाण्यासाठी पाठीमागील भागात असलेल्या प्रवेशद्वारातून नागरिकांना वाट ठेवण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे येथील स्थानिक नगरसेवक आहेत. हळबे हे शहर स्वच्छतेबाबत इतरत्र उडालेल्या बोजवाºयाप्रकरणी महापालिकेच्या महासभांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवत असतात. परंतु, त्यांच्याच प्रभागात उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचा घातलेला घाट आणि त्याकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष आश्चर्यकारक बाब ठरली आहे. तसेच उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच शौचालय असल्याने प्रवेशद्वाराची जागाच चुकीची असल्याचेही बोलले जात आहे.निष्क्रिय कारभार कारणीभूतपुसाळकर उद्यानासमोरील कचराकुंड्या १५ वर्षांपासून तेथेच आहेत. मध्यंतरी काँक्रिटीकरणाचे काम करताना तेथून त्या काही कालावधीकरिता अन्यत्र हलवण्यात आल्या. प्रभाग कचराकुंडीमुक्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, स्थानिक प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्या निष्क्रियतेमुळे कारभार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्या शून्य निर्णय क्षमतेमुळे योग्य प्रतिसाद मिळत नाही. या कुंड्या समोरील वसाहतीसाठी आहेत. ती वसाहत बीएसयूपीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर कायमस्वरूपी कुंड्या बंद करण्यात येतील.सध्या नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून बाजूला असणारे प्रवेशद्वार चालू ठेवण्यात आले आहे.- मंदार हळबे, स्थानिक नगरसेवकव विरोधी पक्षनेते, केडीएमसीआमचे प्रयत्न सुरू आहेतकचराकुंडीमुक्त शहरासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू आहे. परंतु, एखाद्या प्रभागातील कुंड्या हटवताना तेथे पर्यायी यंत्रणा राबवणे महत्त्वाचे असते. जेव्हा यंत्रणा सक्षम होत जाईल, तेव्हा टप्प्याटप्पयाने कुंड्या हटवल्या जातील.- धनाजी तोरस्कर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका