शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:50 IST

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना ओढाताण होत असतानाच आता त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.नेते येतात, अधिकारी येतात, आम्हाला ठिकठिकाणी पिटाळतात. सकाळी ९ पासून मध्यरात्रीपर्यंत काम करूनही महिनाकाठी अवघे पाच हजार रुपये मानधनही आम्हाला वेळेत मिळत नसेल, तर राबराब राबून उपयोग काय, असा सवाल कुटुंबीय आम्हाला करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यासंदर्भात लक्ष घालतील का, असा सवाल हे वॉर्डन करत आहेत.मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर कल्याण-शीळ रस्ता तसेच कल्याण-डोंबिवली शहरांतील अंतर्गत रस्त्यावर कोंडी वाढत आहे. त्यातही ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आम्ही काम करतो. पण, दरवेळेसच आम्हाला मानधनासाठी ताटकळत ठेवले जाते. दुसरीकडे कुठे नोकरी-व्यवसाय करायचा, तर या विचित्र ड्युटीमुळे वेळ मिळत नाही.सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संसार करताना खूपच ओढाताण होते. जूनमध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्या, रक्षाबंधन उत्सव झाला, आता तर गणेशोत्सव तोंडावर आहे. पण, आमची ओंजळच रिकामी असल्याने करायचे तरी काय, असा सवाल त्यांनी डोंबिवली वाहतूक विभागातील अधिकाºयांकडे केला आहे.वाहतूक विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांची बदली झाल्याने नवीन अधिकारी आले आहेत. पण, अजून त्यांना येथील कोंडीचा, त्याच्या निपटाºयाचा अंदाज यायचा आहे. असे असताना आम्ही त्यांना केवळ मानधनासाठी तगादा लावणे, हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.- वाहतूक वॉर्डनना तातडीने आमच्याशी संपर्क साधायला सांगा. गणेशोत्सव त्यांनीही आवर्जून साजरा करावा. त्यांचे मानधन काढले जाईल.- विनीता राणे, महापौर

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका