शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेचे कंत्राट अखेर केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:25 IST

भाईंदर पालिका : दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेवून शहरातील नागरिकांना सातत्याने वेठीस धरणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट अखेर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रद्द केले आहे. या कंत्राटदाराचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाशी संगनमत असल्याचा आरोप करीत आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार केली होती. जैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.मीरा भार्इंदर महापालिकेने बससेवा चालविण्यासाठी गेल्या वर्षी मनोहर सकपाळ यांच्या भागीरथी एमबीएमटीला कंत्राट दिले होते. कोरोनामुळे बससेवा केवळ परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी तसेच पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करण्यासाठी चालवली गेली. त्यानंतर मेपासून पालिकेने कंत्राटदारास बससेवा सुरू करण्यास सांगूनही बस चालवल्या नाहीत. कंत्राटदाराने आॅगस्टपासून केवळ उत्तन मार्गावर पाच बस सुरू केल्या त्याही ८ सप्टेंबरपासून बंद पडल्या.कंत्राटदाराने २५ सप्टेंबरपासून १० बस तर २८ सप्टेंबरपासून २१ बस चालवण्याचे सांगूनही सुरूच केल्या नाहीत. बससेवा नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. पालिका आणि सत्ताधारी भाजपने नागरिकांची गैरसोय दूर करण्याऐवजी कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करून दिल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सरनाईक यांनी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांना केली.वारंवार सांगूनही केले दुर्लक्षकंत्राटदारास मोफत बस दिल्या, अत्याधुनिक डेपो - साहित्य दिले, तिकीट व जाहिरातीचे उत्पन्न दिले. अतिरिक्त पैसे देऊनही त्याला प्रचंड आर्थिक फायदा करूनही तो बस चालवत नसल्याने आमदार जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर आयुक्तांनी सोमवारी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. वारंवार सांगूनही बससेवा सुरू न केल्याने मूळ करारनाम्यासह पुरवणी करारनामाही रद्द केला आहे.वारंवार सांगूनही बससेवा सुरू करत नसल्याने भागीरथीचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, नागरिकांची तातडीची गरज पाहता पालिका बससेवा सुरू करण्याबाबत विचार करीत आहे. परिवहन समितीसमोर प्रस्ताव ठेवून त्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल.- अजित मुठे, उपायुक्त, परिवहन

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक