शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विदेशी मद्याची वाहतूक: राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत २८ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दीपक बोर्डे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने ...

ठळक मुद्देकल्याण शीळ रोडवर कारवाई टेम्पोसह एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दीपक बोर्डे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून विदेशी मद्यासह २८ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्याला दोन दिवस उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा येथून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे डोंबिवलीचे निरीक्षक अनिल पवार, दुय्यम निरीक्षक मल्हारी होळ, विश्वजीत आभाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुनिल माळी, दीपक खडसे, दीपक दळवी आणि शिवराम जाखीरे आदींच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी सोनारपाडा येथील आर्या लॉजसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोाची तपासणी केली. त्यावेळी या वाहनातून १८० मिलीच्या १२०० बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यावेळी टेम्पोसह हे बनावट मद्य जप्त करुन दीपक याला या पथकाने अटक केली. यामध्ये तीन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दीपक याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा दीवा रोडवरील उसरघर येथून हे विदेशी मद्य आणल्याची माहिती दिली. त्यानुसार उसरघर गावातील विट भट्टीजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या झडतीतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा निर्मित मद्याच्या १८० मिलीच्या १६ हजार ५६० बाटल्या आणि ट्रक जप्त करण्यात आला. याठिकाणी २५ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड