शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतुकीवर कारवाईत परिवहन प्रशासन नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:59 IST

लेखापरीक्षण अहवालात ठपका; पाच वर्षांत मार्गतपासणी नाहीच

ठाणे : ठाण्यातील अवैध प्रवासी बस वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा झाल्या आहेत. या बसवर कारवाईचे आश्वासनसुद्धा प्रशासनाने दिले आहे. परंतु,या ही कारवाई करण्यात ते कमी पडत असल्याचा ठपका लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.ठाणे परिवहन सेवेचा २०१५-१६ चा लेखा परीक्षण अहवाल नुकताच सादर झाला. यामध्ये खाजगी बसवरील कारवाईबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने किमान आठवड्यातून एक दिवस तरी खास तिकीटतपासणी कार्यक्रमाचे आयोजन करावे असे नमूद केले आहे. मागील काही वर्षांचा अभ्यास केला असता, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाºया दंडातसुद्धा जवळ जवळ १ लाखांची घट झाली आहे. शिवाय खाजगी बसवर कारवाई करण्यासाठी परिवहन प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून ती होत नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.मागील पाच वर्षात विशेष मार्गतपासणी मोहीम राबविलीच नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. परिवहन प्रशासनाकडून या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचेही सांगण्यात आले आहे. परिवहन सेवेची सध्याची आर्थिक स्थिती खालावली असल्याने अवैध खाजगी वाहतुकीवर कारवाई करणे अपेक्षित असतांनाही ती होत नसेल तर त्याचा परिवहनच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच व्यवस्थापकांनी सुचविलेल्या मोहिमा राबविणे यापुढे गरजेचे असेल, असेही यात नमूद आहे.जप्त वाहनांमुळे कारवाई थंडावलीगेल्या काही महिन्यात परिवहन मार्फत अवैध्य खाजगी वाहतुकीवर कारवाईसाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार काही बसवर दंडाची कारवाई, तर काही जप्त केल्या आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस सहकार्य करीत असल्याचेही परिवहनने स्पष्ट केले आहे. परंतु, जप्त केलेली वाहने लावायची कुठे असा पेच असल्याने ही कारवाई करणे सद्यस्थितीत कठीण जात असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका