शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाणे महापालिका आयुक्तांची बदली करा; कॉंग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 17:03 IST

सत्ताधारी शिवसेनेने  आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  महापालिकेच्या प्रभाग रचनेनवरुन उलट सुलट चर्चा सुरु असतांनाच ठाणे शहर कॉंग्रेसनेही देखील यावर गंभीर आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी शिवसेनेने  आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. प्रभाग रचनेच्या नकाशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यासाठी यापुढेही अशा प्रकारचे फेरफार होण्याची शक्यता असल्याने पालिका आयुक्तांची बदली करून या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला अधिकार न देता निवडणूक आयोगाने स्वतंत्न आयएएस अधिका:याची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

  प्रभाग रचनेवर गंभीर आरोप करण्यात आले असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे हरकती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येनुसार एससी वॉर्ड पडणार आहेत अशा ठिकाणी एससी वॉर्ड पडू नये अशी पप्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रभाग रचना झिगझॅग करून गोलाकार करणे अपेक्षित असताना प्रभाग रचनेची पूर्णपणे मोडतोड तयार करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडणून येण्यासाठी तसेच सत्ता टिकवण्यासाठी नकाशामध्ये फेरफार करण्यात आले असून हा सर्व प्रकार पालिका आयुक्तांच्या देखरेकेखाली तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. यापुढेही मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याची शक्यता असून  यासाठी पालिका आयुक्तांचीच बदली करून या ठिकाणी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. २० प्रभागांची तोडमोड करण्यात आली असून या प्रभागांच्या रचनेवर आक्षेप असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.   तर भाजपचे काम करू काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आघाडीचे संकेत देण्यात आले असले तरी आघडी करायची कि नाही याबाबत स्थानिक नेतृत्वावर सोडले असल्याने  सन्मानपूर्वक जागा देण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. यासाठी आघडीत २५ ते ३० टक्के जागांची मागणी करण्यात आली असून पालिकेच्या महत्वाच्या समित्यांवर वर्णी लावण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जर कॉग्रेसला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या नाहीत तर भाजपचे काम करायला देखील कमी करणार नाही असा अजब इशारा देखील त्यांनी दिला. 

सेनेच्या नगरसेवकांवरही निशाणाकाँग्रेस ३३ पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करणारा असून यामध्ये एसीसी आणि एन.टी उमेदवारांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. एससीच्या जागा निर्माण होऊ नये यासाठी प्रभाग रचनेची खेळी करण्यात आली असली तरी एससीचे उमेदवार शोधण्यासाठी इतर पक्षांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. यावेळी त्यांनी सेनेच्या नगरसेवकांवर देखील निशाणा साधला आहे. सेनेच्या नगरसेवकांचे कर्तृत्व शून्य आहे अशांना तिकीट न देता त्या जागा आम्हाला द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस