शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:24 IST

रद्द करण्याचे कारण गुलदस्त्यात; आवडीच्या शाळेचे स्वप्न भंगणार

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या मोठा गाजावाजा करून समुपदेशनाने केलेल्या बदल्या अवघ्या पाच दिवसांतच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बदल्या कोणत्या कारणामुळे रद्द केल्या, याबाबतचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे आवडीच्या शाळा मिळण्याचे शिक्षकांचे स्वप्न भंगल्याची चर्चा आहे.बदलीच्या अन्यायाविरोधात न्यायालयात गेलेल्या व बदलीबाबत अपिलात गेलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया १४ जून रोजी एनकेटी सभागृहात पार पडली. यावेळी ठाणे जि.प. उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे आणि शिक्षणाधिकारी संगीता भागवत उपस्थित होते.जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीच्या शाळा घेतल्याचा आरोप करून १०९ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच जिल्हांतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंग शिक्षकास लांबची शाळा मिळाली, अवघड क्षेत्र आदी विविध बाबींसाठी ६२ शिक्षकांनी अपील केले होते. या सर्व प्रकरणावर कोकण विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी झाली. त्यानंतर, शुक्रवारी या सर्व शिक्षकांचे समुपदेशन करून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन मुख्याध्यापक, ४४ पदवीधर आणि ११० शिक्षकांचा समावेश होता. त्यापैकी १९ शिक्षकांनी पूर्वी बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र, नंतर त्यांनी ते अर्ज मागे घेतले. त्यामुळे ते १९ शिक्षक सोडून १३७ प्राथमिक शिक्षकांच्या पारदर्शकपणे बदल्या झाल्या. शिक्षकांना त्यांच्या मागणीनुसार शाळा मिळाल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र, अवघ्या पाचच दिवसांत या बदल्या रद्द झाल्या.न्यायालयात धाव घेतलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रि येत प्राधान्यक्र म दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशात तसे नसतानादेखील आपण तसा निर्णय दिला होता. तसेच बदली झालेल्या शिक्षकांना आदेशदेखील देण्यात आले नाहीत. त्यामुळे ही प्रक्रि या रद्द करून कोणताही प्राधान्यक्र म न ठेवता केवळ सेवाज्येष्ठतेसह नव्या नियमानुसार पुन्हा बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असून पालघरहून विकल्पाने आलेल्या ९४ शिक्षकांचीदेखील समुपदेशनाने बदली करण्यात येणार आहे.- संगीता भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. ठाणे

टॅग्स :Teacherशिक्षक