शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

जीएसटीच्या वसुलीसाठी आता ‘तडजोडी’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:02 PM

कर भरण्यासाठी ३० जूनची डेडलाइन : सहआयुक्तांची माहिती

- सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील हजारो व्यापाऱ्यांकडे वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) दोन हजार ३४५ कोटी रुपये जीएसटीची रक्कम थकीत आहे. या विवादित व अविवादित रकमेचा व्यापाऱ्यांनी सरकारकडे त्वरित भरणा करणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य शासनाने नुकताच सेटलमेंट (तडजोड) कायदा लागू केला आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील सर्व व्यापाºयांना जीएसटीसह व्याज व दंडाची रक्कम भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. जूनअखेरपर्यंत भरणा केल्यास सवलतीचा लाभ मिळणे शक्य आहे.

‘जिल्ह्यात जीएसटीची दोन हजार २४५ कोटींची थकबाकी’ या मथळ्याखाली लोकमतने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय ऐरणीवर आणला. त्याची दखल जीएसटीचे ठाणे विभाग सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी घेऊन ‘तडजोड’ कायद्याखाली जिल्ह्यातील जीएसटी भरण्यास टाळाटाळ करणाºया विवादित व अविवादित व्यापाºयांना त्यांचा जीएसटी, व्याज व दंड ३० जूनच्या पहिल्या टप्प्यात भरण्याची संधी दिली आहे. या थकीत रकमेचा भरणा करून आॅनलाइन अर्ज केल्यास व्यापाºयांना मोठा लाभ मिळणार आहे. एवढेच नव्हे तर या रकमेच्या वसुलीबाबतही सुटका मिळणे शक्य असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात थकीत असलेल्या दोन हजार ३४५ कोटींच्या जीएसटीच्या रकमेमधील दोन हजार ६५ कोटी रुपये विवादित म्हणजे अपिलात गेलेल्या व्यापाºयांकडे थकीत आहे. तर, जीएसटीच्या थकीत रकमेतील २८० कोटी रुपये समोरून येऊन भरणारे म्हणजे अविवादित व्यापाºयांकडे थकीत आहे. या विवादित व अविवादित व्यापाºयांनी जूनअखेरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात थकीत रक्कम भरल्यास मोठी सवलत मिळणे शक्य आहे. अन्यथा, १ ते ३० जुलै या दुसºया टप्प्यातील कालावधीत थकीत रक्कम करून आॅनलाइन अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही पहिल्या टप्प्यापेक्षा कमी मिळणार आहे. यावर मात करण्यासाठी ३० जूनच्या आतच थकीत रकमेचा भरणा करणे आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.उर्वरित जीएसटीमाफीची सवलतव्यापाºयांचा प्रलंबित जीएसटीकर, व्याज व दंड तसेच प्रलंबित लेट फी या ठरावीक रकमेचा भरणा केल्यास ‘तडजोड’ कायद्यांतर्गत उर्वरित रक्कम माफ करून घेण्याची संधी व्यापाºयांना प्राप्त झाली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी व्यापाºयांनी जीएसटीच्या mahagst.gov.in या वेबसाइटमधील ‘व्हॉट न्यू’वर जाऊन ‘तडजोड’कायद्याची सविस्तर माहिती घेता येईल. आवश्यक थकीत रकमेचा भरणा केल्यानंतर व्यापाºयांना आॅनलाइन अर्ज करण्याची पद्धतही या वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्याचे कुलकर्णी यांनी निदर्शनात आणून दिले.

टॅग्स :GSTजीएसटी