शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी : दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:47 IST

कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबटयासह वाघ सदृश्य प्राण्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई बदलापुर पाईप लाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देबिबटयासह वाघ सदृश्य प्राण्याची कातडी हस्तगत

कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबटयासह वाघ सदृश्य प्राण्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई बदलापुर पाईप लाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.विशाल लक्ष्मण धनराज आणि सचिन जानर्दन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही ३० ते ३३ वयोगटातील असून रायगड जिल्हयातील चौक येथील रहिवाशी आहेत. दोन व्यक्ती बदलापुर पाईप लाईन रोड कोळेगांव परिसरात वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करीसाठी येणार असल्याची माहीती खब-यामार्फत मिळाल्यानंतर वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष शेवाळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ज्योतिराम साळुंखे, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विश्वास चव्हाण, अरविंद पवार, पोलिस नाईक राजेंद्र घोलप, सुरेश निकुळे, सतिश पगारे, हरिश्चंद्र बांगारा, पोलिस शिपाई अजित राजपुत आदिंच्या पथकाने सापळा लावून दोघांना कातडयांसह अटक केली. या कारवाईत कल्याण वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग वनपाल मुरलीधर जामकर, वनरक्षक संतोष रेवणे आणि वनजीव आभ्यासक सुहास पवार यांनीही सहभाग घेतला होता. अटक आरोपींविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आढळुन आलेले बिबटया सदृश्य कातडे साडेसहा फुट आहे तर वाघ सदृश्य प्राण्याचे कातडे तीन फुटाचे आहे. हे कातडे कोणत्या प्राण्याचे आहे ते समजण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाणार आहे. भारतीय बाजारात कातडयाचे मुल्य शून्य असलेतरी त्याची विक्री दहा लाखांच्या आसपास होते तर नेपाळमार्गे चीनमध्ये नेऊन देखील कातडयांची विक्री केली जाते. बाहेरच्या देशांमध्ये त्याला चौपट किंमत आकारली जाते अशी माहीती वरीष्ठ निरिक्षक जॉन यांनी दिली. दोघांनी कोठेतरी जंगलात शिकार करून मिळविले असल्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली