ठाणे : रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर सोमवारी झालेल्या चर्चेअंती आता आयुक्तांशी चर्चा करून या थकीत देणी कशी द्यायची, याची घोषणा येत्या २५ आॅगस्ट रोजीच केली जाईल, असे आश्वासन महापौर संजय मोरे यांनी दिले. त्यामुळे तूर्तास कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. वारंवार केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याने कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. (प्रतिनिधी)
परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे
By admin | Updated: August 18, 2015 01:46 IST