शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात महिलेची बॅग जबरीने चोरणाऱ्यास वाहतूक पोलिसांनी रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 22:12 IST

रिक्षातून घरी जाणा-या स्पूर्ती लक्ष्मीनारायण (३९) या महिलेची बॅग जबरीने चोरुन पळ काढणा-या श्रेयस पडवळ (२०) या चोरटयाला वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. वाहतूक कोंडीमध्ये रिक्षाचा वेग मंदावल्याचा फायदा घेत त्याने ही चोरी केली होती.

ठळक मुद्देवाहतूक कोंडीचा घेतला फायदारिक्षाचालकासह मोटारसायकलस्वाराचे प्रसंगावधानकोपरी पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरी येथील चेक नाका परिसरात रिक्षातून जाणा-या स्पूर्ती लक्ष्मीनारायण (३९) या महिलेची बॅग हिसकावून पळणा-या श्रेयस पडवळ (२०) या चोरटयाला वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून या महिलेची बॅग हस्तगत करण्यात आली आहे.मुंबई ते नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील कोपरी ब्रिज येथून २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्पूर्ती ही प्रवासी महिला राकेश यादव (४०) यांच्या रिक्षातून घरी जात होती. कोपरी ब्रिजच्या जवळ आल्यानंतर वाहतूक कोंडी असल्यामुळे या रिक्षाची गती मंदावली होती. याचाच फायदा घेत श्रेयस याने या महिलेच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करीत बॅग आपल्याकडे खेचण्याचा या महिलेने प्रयत्न करीत आरडाओरडा केला. त्यावेळी रिक्षा थांबविण्यात आल्याने त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालक राकेश यादव यांनी प्रसंगावधान राखून खुशाल गुरव (३३) या मोटारसायकलस्वाराच्या मदतीने श्रेयस या या चोरटयाला पकडले. त्याचवेळी तिथे पोहचलेल्या कोपरी वाहतूक उपशाखचे जमादार काशिनाथ मोरे, पोलीस हवालदार संजय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सावता वावळ यांनी त्यांना ताब्यात घेतले. कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार टी. एन. डुंबरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक