शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Traffic Jam in Thane: आधीच रस्त्यात खड्डे, त्यात ट्रक बंद पडल्याने मुंबई - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:55 IST

Traffic Jam in thane: ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर आधीच खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र रोजच्या रोज दिसत आहे. त्यात शनिवारी या भागात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तिनहात नाक्यार्पयत गेल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या खडय़ांमुळे शहराच्या विविध भागात तसेच इतर ठिकाणी देखील वाहतुक कोंडीचा ताप वाहन चालकांना सहन करावा लागल्याचे चित्र शनिवारी ठाण्यात दिसून आले. त्यात साकेत उड्डाणपुलाखालीच ट्रक बंद पडल्याने या वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिनहात नाका ते नाशिककडे जाणा:या मार्गावर वाहतुक कोंडीचा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागला. जवळ एक तास ही कोंडी फुटल्याचे दिसून आले नाही. त्यात जिल्ह्याच्या इतर ठिकाणी देखील रस्त्याला खड्डे पडले असल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले होते.

 ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर आधीच खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र रोजच्या रोज दिसत आहे. त्यात शनिवारी या भागात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तिनहात नाक्यार्पयत गेल्याचे दिसून आले. हा ट्रक काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्यातही या मार्गावर पडलेल्या खडय़ांचा ताप नाहक वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसापूर्वीच या मार्गावरील खडय़ांना तात्पुरता मुलामा लावण्यात आला होता. परंतु पाऊस पडताच हा मुलामा वाहुन गेल्याने पुन्हा या मार्गावर खड्डे पडले आहेत. या संदर्भात ठाणो वाहतुक पोलिसांच्या वतीने एमएसआरडीसी, बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु आज करु उद्या करु अशी कारणो सांगून खड्डे काही बुजविले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच वाहतुक कोंडी होत असल्याचेही सांगितले जात आहे.

(फोटो - विशाल हळदे)

शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, कोपरी पूल आणि शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी ४ नंतरही या मार्गांवर वाहतूक कोंडी असल्याचे चित्र होते. या वाहतूक कोंडीमुळे अवघे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांवर २० ते २५ मिनीटे लागत होती. अनेकांना कामाच्या ठिकाणीवेळेवर पोहचता आले नाही. 

 या मार्गावर खड्डे पडल्याने तसेच अचानक ट्रक बंद पडल्याने येथे वाहतुक कोंडी झाली होती. त्याठिकाणावरील ट्रक बाजूला काढण्यात येऊन, वाहतुक कोंडी सोडविण्यात आली आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी संबधींत यंत्रणोला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.(बाळासाहेब पाटील - पोलीस उपायुक्त, वाहतुक विभाग ठाणे)

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे