शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 10:57 IST

Traffic jam in Thane : सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात वाहतुकीचे तीन - तेरा वाजले. त्यामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. रस्त्याच्या मधोमध उमटलेल्या कंटेनर हरवण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Traffic jam in Thane due to overturned container on Mumbra bypass!)

मुंब्रा बायपास रोडवरील हॉटेल लाल किल्ला जवळ बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एक कंटनेर उलटून रस्त्याच्या मधोमध आडवा झाला आहे. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी या घटनेमुळे मुंब्रा बायपास रोडवर मोठया प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. त्यातून ही कोंडी सकाळी हळूहळू वाढत शहरात कोंडीचे चित्र पाहण्यास मिळून लागले. त्यातच सकाळी कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेल्या चाकरमानी या कोंडीत अडकून पडले आहे. मुंब्र्यात रस्त्याच्या मधोमध उमटलेल्या कंटेनर हलविण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली असून त्यानुसार तो कंटेनर हलविण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. 

या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. मात्र, रात्र असल्याने कंटेनर हलवता आले नाही. सकाळ होताच कंटेनर हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे शहरात आणि शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातामुळे ठाण्याकडून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली आहे. परिणामी नाशिकहून मुंबई कडे तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली आहे. काही वेळातच वाहतूक पूर्ववत होईल असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी