शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Traffic Jam In Thane: ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 12:24 IST

Traffic Jam In Thane: ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ठाणे - ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघे 200मीटरचें अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक तासाचा कालावधी लागतं होता. यामुळे सकाळच्या वेळी शाळेत जाणारे  विद्यार्थी कामावर जाणाऱ्या नागरिकांना तात्कळत उभे राहावे लागले.

ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने  साकेत पूल ते माजिवडा नाकापासून अगदी घोडबंदर कासारवडवली नागला बंदर  वाहतूक कोंडीत अडकली . याचवेळी  भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनीटांचे अंतर पार करण्यास वाहनांना अंदाजे दोन तास लागत होता. याचा अधिकचा फटका सकाळच्या वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला अनेक विद्यार्थी रस्त्यातच अडकले होतें. या वाहतूक कोंडीत रिक्षा आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसेस. बेस्ट च्या बसेस अडकल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरात सतत पडत असलेल्या पावसाने आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यापायी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतं असून त्याचा नाहक त्रास वाहचालक आणि नागरिकांना सहन करावा लागतं आहे.विशेष म्हणजे घोडबंदर मार्गांवरही बोरिवलीच्या दिशेच्या मार्गीकेवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.त्यातच जोरदार पाऊस झाल्याने   येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदवला गेला.

परिणामी या मार्गांवरही  सकाळपासून  मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती . महत्वाची बाब म्हणजे इतर वेळी रस्त्यावर उभे वाहतूक पोलीस कर्मचारी मात्र कुठेच दिसून आलें नाहीत. स्थानिक नागरी आणि काही रिक्षाचालक रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होतें.त्यातही मधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अडचणीत आणखीनचं भर पडत होती.मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत न घेतल्याने रस्त्यावरील खड्डे भरण्यातही संबंधित यंत्रणानां अडचण येतं आहे. घोडबंदर मार्गांवरून ठाणे मुंबई कल्याण नवी मुंबई आदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक कामावर जात असतात या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कार्यालयात पोहचण्यास उशीर झाला. तर काही जणांनी पुन्हा घरी जाणेच पसंद केले.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी