शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:00 IST

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम ...

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम होऊन मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या मधोमध उलटलेला कंटेनर हलवण्यासाठी तीन हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली. सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

मुंब्रा बायपास रोडवरील हॉटेल लाल किल्ल्याजवळ बुधवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर उलटून रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी मुंब्रा बायपास रोडवर मोठी वाहतूककोंडी झाली. ही कोंडी सकाळपर्यंत ठाण्यापर्यंत पोहोचून, शहरातही वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेले चाकरमानी या कोंडीत अडकून पडले. तीन हायड्रा क्रेनच्या मदतीने कंटेनर हलवल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र असल्याने कंटेनर हलवता आला नाही. सकाळ होताच कंटेनर हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान या अपघातामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसह शहरातून बाहेर जाणाऱ्या, तसेच ठाण्याकडून पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली. परिणामी नाशिकहून मुंबईकडे, तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर वाहतूककोंडी झाली.

अपघातग्रस्त कंटेनर हा ठाण्यातून जेएनपीटीकडे जात होता. बायपासवर कंटेनरचा टायर फुटला आणि तो ठाण्याकडून जाणाऱ्या वाहिनीवर मधोमध उलटला. बायपासवरील ठाण्याकडे येणारी वाहिनी सुरळीत सुरू असल्याने त्या वाहिनीवर कोंडी झाली नव्हती. कंटेनर उचलण्यास सुरू केल्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली. कंटनेर उचलून बाजूला करण्यास दहा ते साडेदहा वाजले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.    - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

२४ तासांत दुसरी घटनाबुधवारी दुपारी तळोजाहून भिवंडीकडे निघालेला ट्रक मुंब्रा बायपासवरील मुंब्रादेवी रोडच्या कडेला उलटला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून हा ट्रक जेवणासाठी लागणाऱ्या तेलाच्या बॅगने भरला होता. बायपास रोडवरील २४ तासांमधील ही दुसरी घटना आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एमएमआरडीएकडे वर्ग करण्याची गरज

येथील बायपासवर बहुतांश ठिकाणी गतिरोधक नाहीत. जे आहेत ते सुस्थितीत नाहीत. त्यामुळे असमतोल झालेल्या या रस्त्यावर वाहनचालकाचे संतुलन बिघडून अपघाताच्या घटना नेहमी घडत आहेत. ठराविक दिवसांनी घडत असलेल्या या घटनांना आळा बसावा, यासाठी रस्त्याची व्यवस्थित डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. देखभालीसाठी हा रस्ता एमएमआरडीएकडे वर्ग करण्याची मागणी मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.  

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक