शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कल्याण-शीळ महामार्गावर दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:06 IST

लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून रेल्वे बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवासी आणि अडकून पडलेले नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत आहेत.

डोंबिवली : लॉकडाउनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या खाजगी व सरकारी वाहनांना येजा करण्यास परवानगी आहे. मात्र, लॉकडाउनच्या चौथा टप्प्यात काही निर्बंध शिथील झाल्याने नागरिकांनी वाहने रस्त्यावर आणायला सुरुवात केली आहे. अनेक जण ई-पास काढून कल्याण-शीळ रस्त्याने मुंबई, पुणे व कोकणात जाऊ लागले आहेत. त्याच भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सलग दुसºया दिवशी शिळफाट्यावर वाहतूककोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून रेल्वे बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवासी आणि अडकून पडलेले नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत आहेत. मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येणाºया वाहनांच्या तुलनेत शीळ मार्गावर जाणाºया चारचाकी वाहनांसह बसची संख्या बुधवारी जास्त होती. बहुतांशी प्रवासी हे खासगी मोटार व बसने सकाळपासूनच प्रवासाला निघाले होते. मजूर आपापल्या राज्यांमध्ये गेल्यानंतर कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये अडकून पडलेल्या पुणे, कोकणातील नागरिकांनी ई-पास मिळवून ठिकठिकाणी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर ७२ तासांच्या आत प्रवासासाठी पोलीस परवानगी मिळत आहे.अनेक जण सकाळी उन्हाच्या आत प्रवास सुरू करत आहे. त्याच वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची वाहनेही कल्याण-शीळ मार्गाने मुंबईकडे जातात. त्यामुळे दिवसभराच्या तुलनेत या मार्गावर सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० पर्यंत वाहनांची वर्दळ अधिक असते. रस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या वेगावर परिणाम होत असल्याने वाहनांची कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.एकेरी वाहतूक : कल्याण-शीळ रस्त्याचे काही भागांत रुंदीकरण झाल्यानंतर आता त्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळेही काही ठिकाणी एकाच लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू आहे. अशा ठिकाणी मोठी बस, ट्रक आल्यास सर्वच वाहनांना वाट काढताना कसरत करावी लागले. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे काही मोटारचालकांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली