शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल

By अजित मांडके | Updated: September 6, 2023 16:18 IST

टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून तर, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात दहीहांडी उत्सव साजरा होणार आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असल्याने त्या त्या भागात वाहतुक कोंडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतुक कोंडीचा त्रास होऊ नये या उद्देशाने ठाण्यासह पोलीस आयुक्तालयात दहीहांडी उत्सवाच्या काळात वाहतुक बदल केले जाणार असल्याची माहिती वाहतुक पोलीसांनी दिली. परंतु यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होणार असल्याची चिन्हे निर्माण झाल्याने ठाणेकरांना पुन्हा त्याचा ताप सहन करावा लागणार आहे.

टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून तर, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या कोर्टनाका मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेकडील वाहतूक कारागृह मार्गे, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथून वळविली आहे. तर, ठाणे स्थानकातून कोर्टनाकाच्या दिशेकडील वाहतूक नौपाडा-बी-केबिन आणि मूस रोड मार्गे वळविली आहे. त्यामुळे या पयार्यी मार्गांवर भार येणार आहे.वसंत विहार येथील हिरानंदानी मिडोज भागात स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे उपवन, पवारनगर येथून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकाच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना त्यागराज इमारत येथे प्रवेशबंदी करण्यात येत आहे. येथील वाहने वसंत विहार चौकातून तुळशीधाम मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. तसेच खेवरा चौक येथून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकाच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना शिवसेना शाखेजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खेवरा चौक, दोस्ती इम्पेरिया इमारत, तुळशीधाम मार्गे वाहतूक करतील.

बाळकूम येथे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी आयोजित केली जात आहे. यासाठी साकेतहून कशेळी, काल्हेर मार्गे वाहतूक करणाºया वाहनांना बाळकूमच्या दिशेने वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. येथील वाहने महालक्ष्मी मंदीर मार्गे वाहतूक करतील. तर, कशेळीहून बाळकूमच्या दिशेने वाहतूक करणाºया वाहनांना कापूरबावडी मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढणार आहे.

मिनाताई ठाकरे चौकात भाजपचे पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दहीहंडी आयोजित केली आहे. मिनाताई ठाकरे चौकातून वाहन चालक उथळसर, खोपट आणि कोर्टनाका येथे वाहतूक करतात. चौकात मंडप आणि व्यासपीठ उभारल्याने वाहन चालकांना अडथळा होणार आहे. याशिवाय नौपाडा, घोडबंदर, वागळे इस्टेट आदींसह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणी  हंडीचे आयोजन आहे. येथेही वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे.दुसरीकडे गोविंदा पथकांच्या वाहनांना ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बंदी असणार आहे. पथकांना त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर उभी करता येतील. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी, तीन हातनाका, धर्मवीरनगर नाका, नितीन कंपनी येथून ठाणे शहरात वाहतूक करणाºया राज्य परिवहन सेवेच्या बस, टीएमटी, बेस्ट आणि खासगी बसला वाहतूकीस बंदी असेल. ही वाहने कॅडबरी नाका, खोपटनाका, मिनाताई ठाकरे चौक, कोर्टनाका,आंबेडकर पुतळा येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतील. टॉवर नाका, गडकरी रंगायतन, मांसुदा तलावाच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी असणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीDahi Handiदहीहंडी