शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘टोइंग’ने रिक्षाला नेले फरफटत; चालक गंभीर; उल्हासनगरात व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:00 IST

नेताजी चौकात रस्त्यालगत लावलेली मोटारसायकल उचलण्याच्या वेळी टोइंग गाडीने एका रिक्षाला धडक देत भाटिया चौकाकडे फरफटत नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कॅम्प नंबर ४ नेताजी चौकात मंगळवारी दुपारी टोइंग गाडीने रिक्षाला जोरदार धडक देऊन फरफटत नेल्याने चालक राकेश तिवारी गंभीर जखमी झाला, तर गौतम दादलानी या तरुणाला मार लागला असून, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली आहे. 

नेताजी चौकात रस्त्यालगत लावलेली मोटारसायकल उचलण्याच्या वेळी टोइंग गाडीने एका रिक्षाला धडक देत भाटिया चौकाकडे फरफटत नेले. यामुळे चालक राजेश तिवारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर रस्त्यावर उतरून टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली असून, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरेश कृष्णानी यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

घाबरलेल्या चालकाने काढला पळनेताजी चौकात टोइंग गाडीविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरल्याने, टोइंग गाडीवरील चालक भीतीने पळून गेला. हिललाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाऱ्यांची समजूत काढून रिक्षाचालक राकेश तिवारी याला रुग्णालयात हलविले. टोइंग गाडी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून, पोलिस तपास करीत आहेत.

टोइंग गाडी बंद केल्यास वाहतूककोंडीऐन सणासुदीच्या काळात टोइंग गाडी बंद केल्यास, वाहतूककोंडीची भीती व्यक्त होत आहे. व्यापारी व नागरिक बेशिस्तपणे रस्त्यांवर वाहने पार्किंग करीत असल्यानेच टोइंग गाडी व व्यापारी यांच्यात वाद निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर