शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमीची तब्बल २७ कोटींची कामे कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 04:32 IST

ग्रामस्थ अचंबित : जिल्हा प्रशासन मात्र ढिम्मच

सुरेश लोखंडेठाणे : यंदा महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमीच्या (एमजीनरेगा) सुमारे ४८ हजार ७७४ कामांचे नियोजन जिल्ह्यात केले आहे. त्यावर सुमारे २६ कोटी ९३ लाख रूपये खर्च होणार आहेत. मात्र, पावसाळा संपल्यानंतर या कामांना जिल्ह्यात कोठेही सुरुवात झाली नाही. यामुळे ग्रामस्थांकडून कामांची शोधाशोध सुरू झाली आहे. तर बहुतांशी शेतमजूर गावे सोडून अन्यत्र मोठ्या संख्येने जात आहेत. मात्र, यानंतर जिल्हा प्रशासनाने ढिम्म राहून बघ्याची भूमिका घेतली आहे.

यंदाच्या पावसाने वेळी आधीच एक्झीट घेतली आहे. यामुळे खरिपाची कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत. बहुतांशी शेतकºयांनी भातकापणीसह अन्यही कामे घरच्या घरीच केली. यामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या ग्रामीण तालुक्यांमधील शेतमजुरांच्या हाताला कामे मिळाली नाहीत. त्यांनी गावात कसा तरी दिवाळीपर्यंत उदरनिर्वाह केला असून आता कामाच्या शोधात गावे सोडली आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने आधीच वर्षभरासाठी सुमारे २७ कोटींच्या कामांचे नियोजन केले होते. परंतु, ही कामे आजपर्यंत सुरू केली नसल्यामुळे मजुरांना रोजगारासाठी अन्यत्र जावे लागत असल्याचे सामाजिक संघटनांकडून सांगितले जात आहे.

गावखेड्यात रोजगाराची समस्या गंभीरगावखेड्यातील मागेल त्यास काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ८६ लाख मनुष्य दिन कामांची निर्मिती केली आहे. त्यातून ४८ हजार ७७४ कामे मजुरांकडून करून घेण्याचे नियोजनही केले. मात्र, पावसाने दडी मारल्यानंतर प्रशासनाने या नियोजनामधील कामे हाती घेण्याची गरज होती. परंतु अद्यापही प्रारंभ झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात सध्या रोजगार समस्या गंभीर होत आहे. यावर गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून जिल्हा परिषदेसह कृषी विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, लघू पाटबंधारे, वन विभाग आणि ग्राम पंचायत यंत्रणेने नियोजनाप्रमाणे मनरेगाची कामे सुरू करण्याची ग्रामस्थंची अपेक्षा आहे.मजुरांचे परजिल्ह्यासह परराज्यात स्थलांतरया कामांमुळे ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील मजूर स्वत:च्या गावी काम करून आर्थिक सुबत्ता मिळवण्याची शासनाची अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या विलंबाने आदिवासी, दुर्गम भागातील मजूर मुंबईसह गुजरात परिसरात वीटभट्टी, रेती उत्खनन, दगडखाणीच्या कामासाठी स्थलांतरीत होत आहेत.या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी पाणीटंचाईच्या कामांसह शेततळी, गावतळी, रस्ते, गोठे, फळबागा लागवड, रोपवाटिका, शौचालये, घरकूले आदी कामे सुरू होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका