शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका, पोलिसांमध्ये टोलवाटोलवीचे नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:20 IST

शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत महापालिका व पोलीस टोलवाटोलवी करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पाठवलेली बोगस डॉक्टरांची यादी मिळाली

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत महापालिका व पोलीस टोलवाटोलवी करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पाठवलेली बोगस डॉक्टरांची यादी मिळाली नसल्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला असून पालिकेने तक्रार दाखल केल्यावरच बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी दिली.उल्हासनगरमधील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे. २७ आॅगस्टला १६ वर्षांच्या सीमरन शर्मा नावाच्या मुलीचा तापाने काही तासांत मृत्यू झाल्याने बोगस डॉक्टरांचा प्रकार समोर आला. यापूर्वी नागरिकांनी बोगस डॉक्टरांबाबत पालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे असंख्य तक्रारी आल्या. मात्र, त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही, असा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे.महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. के.आर. खरात यांनी बोगस डॉक्टरांवर १० वर्षांपूर्वी मोहीम उघडली होती. अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्याने इतरांनी दवाखाने बंद केले. त्यानंतर, मात्र एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नाही. रगडे, नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे आदींनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली. मात्र, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी केवळ कागदी घोडेच नाचवले. ८ बोगस डॉक्टरांची नावे पोलिसांना दिल्याचे डॉ. रिजवानी यांनी सांगितले. तर, दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी एकत्र येऊन शहरातून कॅण्डल मोर्चाही काढला.डॉ. रिजवानी यांनी बोगस डॉक्टरांची यादी पोलिसांना पाठवल्याचे सांगितले होते. मग, पोलीस कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. याबाबत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांना कारवाईबाबत विचारले असता, त्यांनी यादी आलीच नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यादी आल्यानंतरही जोपर्यंत पालिका अधिकारी प्रत्यक्ष तक्रार करत नाही, तोपर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई अथवा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे. यापूर्वी बोगस डॉक्टरांवर पालिकेनेच कारवाई केली होती. मात्र, डॉ. रिजवानी जाणीवपूर्वक बोगस डॉक्टरांवर कारवाईबाबत टोलवाटोलवी व पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक गजानन शेळके, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे. यानंतर, बोगस डॉक्टरांकडून अनुचित घटना घडल्यास पालिका आयुक्तांसह वैद्यकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे रगडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस